शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलवाद्यांचे कर्दनकाळ संजय साबळे यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 00:33 IST

नक्षलवादी बरजू पिगाठीला केली अटक

ठाणे : तब्बल ५६ पोलिसांना ठार मारणाऱ्या कुख्यात नक्षलवादी बरजू पिंगाठी याला अटक करणारे तर दोन नक्षलवाद्यांना ठार करणारे नक्षलवादी विभागातील लालेकसा पोलीस ठाण्याचे तत्कालीन व ठाणेनगर पोलीस ठाण्याचे विद्यमान पोलीस निरीक्षक (गुन्हे) संजय साहेबराव साबळे यांना प्रजासत्ताक दिनी विशेष सेवा पदकाने सन्मानित केले. आतापर्यंत साबळे यांनी जवळपास २०० बक्षिसे पटकावली आहेत.साबळे हे १९९२ साली महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून भरती झाले. मूळ साताºयाचे रहिवासी असलेले साबळे यांना पहिले पोलीस ठाणे हे उल्हासनगर मिळाले. शहर पोलीस आयुक्तालयाबरोबर त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तालयातही, अनेक गुन्हे उघडकीस आणले. डिसेंबर २०१० मध्ये साबळे हे पोलीस निरीक्षक झाले. या पदावरील त्यांची पहिली नियुक्ती नक्षलवादी क्षेत्र असलेल्या लालेकसा पोलीस ठाण्यात २०११ मध्ये झाली. २०११ ते २०१४ असे नक्षलवादी क्षेत्रात कर्तव्य बजावताना,साबळे हे नक्षलवाद्यांना पकडण्यासाठी गेले असता अचानक झालेल्या गोळीबारात साबळे यांनी दोन नक्षलवाद्यांना ठार केले. त्यानंतर ५६ पोलिसांना ठार मारणाºया बरजू पिंगाठी याला पकडले. त्यानंतर त्यांनी आणखी चार नक्षलवाद्यांनाही अटक केली. बरजू याला पकडल्यावर तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी चक्क आनंदाच्या भरात साबळे यांना मिठी मारली.नक्षल भागातील कामगिरीबद्दल १ मे २०१६ रोजी त्यांना विशेष सेवा पदक जाहीर झाले. साबळे यांची ठाणे शहर आयुक्तालयात बदली झाली. कापूरबाबडी, मुंब्रा येथे काम करताना, १ जुलै २०१८ रोजी त्यांनी ठाणेनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) म्हणून पदभार स्वीकारला. ठाणे बाजारपेठेतील कृष्ण मंदिरातील ४० लाखांचे दागिने गोकुळाष्टमीपूर्वी चोरीला गेले. तो गुन्हा गोकुळाष्टमीच्या दिवशीच उघडकीस आणण्याची उल्लेखनीय कामगिरी त्यांनी केली.

टॅग्स :Policeपोलिसnaxaliteनक्षलवादी