शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘त्याने’ स्थापन केली चिंतामुक्त अंत्यसंस्कारासाठी खासगी कंपनी, २ हजार कोटींची उलाढाल करणार?

By अजित मांडके | Updated: November 12, 2022 05:45 IST

मुंबईतील संजय रामगुडे यांना या चिंतेतच व्यवसायाची संधी दिसली.

ठाणे :

मूलबाळ नसलेली वृद्ध दाम्पत्य, परदेशात मुले-मुली असल्याने एकाकी असलेले वृद्ध आई-वडील, अंथरूणाला खिळलेल्या व्यक्तींना मृत्यूनंतर आपल्यावर विधिवत अंत्यसंस्कार कोण करणार, अशी चिंता मनोमन कुरतडते. मुंबईतील संजय रामगुडे यांना या चिंतेतच व्यवसायाची संधी दिसली. त्यासाठी कंपनी स्थापन करून त्यांनी अशा निराधारांच्या अंत्यसंस्काराचे कंत्राट घ्यायला सुरूवात केली. आजवर पाच हजार व्यक्तींवर त्यांनी या पद्धतीने अंत्यसंस्कार केले आहेत. या चिंतामुक्त अंत्यसंस्कारातून ५० लाखांची उलाढाल झाली असून बदलत्या जीवनशैलीमुळे येत्या काळात ती २,००० कोटींवर जाईल, असा त्यांना विश्वास आहे. 

मुंबईत रामगुडे यांच्या सुखांत फ्युनरल मॅनेजमेंट प्रा. लि. कंपनीची मुख्य शाखा आहे. त्यांच्याकडे सुमारे २० कर्मचारी कार्यरत आहेत. रामगुडे कित्येक वर्षांपासून सिनेसृष्टीत निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून कार्यरत होते. ३० वर्षांपूर्वी वाराणसीत चित्रपटाच्या शूटिंगनिमित्ताने ते गेले असता, तेथील घाटावर सुरू असलेल्या मरणोत्तर विधींनी त्यांचे लक्ष वेधले. यातूनच कंपनी स्थापन करण्याची कल्पना त्यांना सुचली. त्यानंतर मरणोत्तर सर्व प्रक्रियेचा अभ्यास करण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यातूनच आठ वर्षांपूर्वी कंपनी सुरू केली. सध्या संपूर्ण देशात अशा प्रकारचे काम करणारी ही एकमेव कंपनी असल्याचा दावा ते करतात.

नातलगाचे निधन झाल्याचे समजल्यानंतरही अनेकांना धकाधकीच्या जीवनात तिकडे जाता येत नाही. मरणानंतरचे सर्व सोपस्कार करण्यासाठी माहिती असलेली माणसे मिळत नाहीत. रामगुडे यांच्या कंपनीकडे तुम्ही अगोदर नोंदणी केली, तर निधनाची माहिती मिळाल्यावर अवघ्या एका तासात कंपनीची टीम तेथे पोहोचून तिरडी बांधण्यापासून स्मशानभूमीत नाव नोंदणीची कामे सुरू करते. ज्यांच्या त्यांच्या समाजाप्रमाणे अंत्यसंस्कार केले जातात, असे ते सांगतात. तसेच मरणोत्तर मोक्षप्राप्तीसाठी त्यांची टीम प्रार्थना करते.

सुखांत मृत्यू... या आहेत सुविधा वृद्ध दाम्पत्य, विदेशात मुले असलेल्यांची सोय   अंत्यसंस्काराचा व्हिडिओ घरपोच मृत्यू प्रमाणपत्र पाठवण्याची सुविधा आई- वडिलांचा फोटोही देण्याची व्यवस्था  इच्छा असेल तेथे होणार अस्थी विसर्जन  मरणोत्तर मोक्षप्राप्तीसाठी प्रार्थना

२,००० कोटींचे लक्ष्य आतापर्यंत पाच हजार जणांवर अंत्यसंस्कार.   मृत्यूनंतर आपले अंत्यसंस्कार नीट हाेण्यासाठी १५०० जणांनी केले ॲडव्हान्स बुकिंग. कोरोना काळात रामगुडे यांनी स्वत: केले २६० जणांचे अंत्यसंस्कार. या योजनेचे पाच लाख मेंबर करण्याचा मानस. त्यातून २,००० कोटींची उलाढाल करण्याचे स्वप्न.  हा संपूर्ण व्यवसाय टॅक्स फ्री असल्याचा दावा. 

दोन प्रकारच्या सेवाजर आधीच बुकिंग करून सर्व सुविधांसाठी मेंबर झालात, तर ३७,७०० रूपये.फक्त अंत्यसंस्कारासाठी टीम बोलावली, तर ८,५०० ते १२,५०० रूपये.

टॅग्स :thaneठाणे