शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

संजय रोकडे खून प्रकरण : पाच आरोपींना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 03:24 IST

चार वर्षांपूर्वी झालेल्या शिवसैनिक संजय रोकडे यांच्या हत्येप्रकरणी पाच आरोपींना ठाणे न्यायालयाने मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

ठाणे : चार वर्षांपूर्वी झालेल्या शिवसैनिक संजय रोकडे यांच्या हत्येप्रकरणी पाच आरोपींना ठाणे न्यायालयाने मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पाच आरोपींमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. मंगेश देविदास जाधव, मनिष देविदास जाधव, नीलेश खंडू कटारे, मनोज जयराम सोनवणे आणि गणेश नारायण देवाडिगा अशी त्यांची नावे आहेत.ठाण्यातील शासकीय मनोरुग्णालयात नोकरीला असलेले संजय रोकडे हे शिवसैनिक होते. त्यांचे आणि आरोपींचे जुने वैर होते. एका खून प्रकरणामध्ये संजय रोकडे यांनी आरोपींविरुद्ध न्यायालयासमोर साक्ष नोंदविली होती. त्यामुळे या आरोपींना न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. तेव्हापासून आरोपी आणि संजय रोकडे यांच्यात वैर निर्माण झाले होते. मधल्या काळात संजय रोकडे आणि आरोपींनी एकमेकांविरुद्ध काही तक्रारीही पोलिसांकडे दाखल केल्या. संजय रोकडे आधी टेकडी बंगला भागात वास्तव्यास होते.आरोपींकडून मोठ्या प्रमाणात त्रास होऊ लागल्याने ते चरई भागात राहण्यास आले. मात्र आरोपी त्यांच्यावर नजर ठेवून होते.२२ जुलै २०१४ रोजी सायंकाळी ठाण्यातील तीन पेट्रोलपंपांजवळ आरोपींनी रोकडे यांना गाठले. लोखंडी रॉड आणि इतर शस्त्रांनी आरोपींनी रोकडे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यात रोकडे यांचा मृत्यू झाला.नौपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक मच्छिंद्र थोरवे यांनी या प्रकरणाचा तपास केला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. आर. कदम यांच्या न्यायालयासमोर हा खटला चालला.या प्रकरणाच्या तपासामध्ये तपास अधिकाºयाने केलेल्या अक्षम्य हलगर्जीवर न्यायालयाने कठोर ताशेरे ओढले असून, सरकारी वकिलाच्या भूमिकेची प्रशंसा केली. जिल्हा सरकारी वकील संगीता फड यांनी या प्रकरणी २० साक्षीदार तपासले. तपास अधिकाºयाच्या भूमिकेवर न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले असताना, फड यांनी वेगवेगळ्या खटल्यांचे दाखले न्यायालयासमोर मांडून आरोपींना कठोर शिक्षेची मागणी केली. त्यानुसार सर्व साक्षीदारांचे जबाब आणि पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने पाचही आरोपींना जन्मठेप आणि प्रत्येकी १0 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

टॅग्स :Crimeगुन्हाCourtन्यायालयMurderखून