शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

राज्याचे माजी पोलिस महासंचालक संजय पांडे यांची तीन तास चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 08:57 IST

खंडणी वसुली प्रकरण; पांडे यांनी केला आराेपांचा इन्कार

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : खोटे गुन्हे दाखल करणे, कटकारस्थान करणे आणि खंडणी उकळणे असे आरोप असलेले राज्याचे माजी पोलिस महासंचालक संजय पांडे यांची ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडून बुधवारी तीन तास चौकशी करण्यात आली. याच गुन्ह्यात पांडे यांच्यासह अन्य सहा जणांना मुंबई उच्च न्यायालयाने ३ जानेवारीपर्यंत अटकेपासून संरक्षणासाठी अंतरिम जामीन दिला आहे.

पोलिसांच्या चौकशीला पांडे यांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र, आपल्यावरील आरोपांचा इन्कार करीत, हे आरोप तथ्यहीन असल्याचे त्यांनी चौकशीमध्ये पोलिसांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

दोन बड्या नेत्यांच्या नावासाठी दबाव nखंडणी प्रकरणातील कथित आरोपी पांडे हे गुन्हे शाखेत आल्याची माहिती मिळाल्यानंतर तक्रारदार पुनामिया हेही या कार्यालयाच्या बाहेर दुपारी २ वाजेच्या सुमारास दाखल झाले होते. nमीरा भाईंदरच्या करोडो रुपयांच्या जमीन घाेटाळ्यात काही अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये दोन बड्या नेत्यांची नावे घ्यावीत, असा दबाव पांडे यांनी आपल्यावर आणल्याचा आरोप पुनामिया यांनी प्रसारमाध्यमांकडे केला.

अन्य सहा जणांचा आरोपींमध्ये समावेशपांडे यांच्याविरुद्ध ठाण्यातील २६ ऑगस्ट २०२४ रोजी भाईंदरचे बांधकाम व्यावसायिक संजय पुनामिया यांनी गुन्हा दाखल केला. तत्कालीन विशेष सरकारी वकील शेखर जगताप, निवृत्त सहायक पोलिस आयुक्त सरदार पाटील, गुन्हे शाखेचे तत्कालीन निरीक्षक मनोहर पाटील, श्यामसुंदर अग्रवाल, शरद अग्रवाल आणि शुभम अग्रवाल या अन्य सहा जणांचा आरोपींमध्ये समावेश आहे. 

याच प्रकरणामध्ये ठाणे गुन्हे शाखेच्या वागळे इस्टेट युनिटमध्ये चौकशीसाठी पांडे यांना पाचारण केले होते. सामान्य व्यक्तीप्रमाणे एका रिक्षाने दाखल झालेल्या पांडे यांची गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक सलील भोसले यांनी चौकशी केली.

टॅग्स :Mumbai policeमुंबई पोलीस