शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मिनी थिएटरसाठी रंगकर्मी आंदोलनाच्या पवित्र्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 00:33 IST

घोडबंदर भागातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहातील मिनी थिएटर दुरूस्तीही न करता अघोषित बंद ठेवल्याने तेथील स्पर्धा, विविध कार्यक्रम, प्रयोगांना फटका बसून नाट्य चळवळीलाच नख लागले आहे

ठाणे : घोडबंदर भागातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहातील मिनी थिएटर दुरूस्तीही न करता अघोषित बंद ठेवल्याने तेथील स्पर्धा, विविध कार्यक्रम, प्रयोगांना फटका बसून नाट्य चळवळीलाच नख लागले आहे. दुरुस्तीच्या नावासाठी बंद झालेल्या या मिनी थिएटरबाबत ठाण्यातील कलाकारांनी नाराजी व्यक्त केली असून प्रशासनाच्या गलथान कारभारावर ताशेरे ओढले आहे. योग्य वेळेत आणि चांगल्या अवस्थेत हे मिनी थिएटर सुरू व्हावे, अशी अपेक्षा हे रंगकर्मी व्यक्त करीत आहेत. तसे न झाल्यास ठाण्यातील सर्व रंगकर्मी आंदोलन करतील, असा कडक इशाराही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला.प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर डॉ. घाणेकर नाट्यगृहातील मुख्य थिएटर आॅगस्ट महिन्यात सुरु झाले. पण मिनी थिएटर मात्र १ आॅक्टोबरपासून अघोषित बंद ठेवण्यात आले. दुरूस्तीसाठी ते बंद ठेवण्यात आले असले तरी त्याचे काम अद्यापही सुरु च झाले नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यासाठी अजून खर्चही मंजूर झालेला नाही, तरीही ते बंद ठेवण्यात आले आहे. याबाबत ठाण्यातील कलाकारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.विश्वासात तरी घ्यापालिकेतील सांस्कृतिक विभाग हा सगळ््यात कमी लक्ष दिला जाणारा विभाग आहे, असे वाटू लागले आहे. प्रत्येक प्रभागात नको असलेल्या अ‍ॅम्फी थिएटरसाठी प्रस्ताव येतात. त्यांचा मात्र फारसा वापर होताना दिसत नाही. घाणेकर नाट्यगृहातही अ‍ॅम्फी थिएटर आहे हे अनेकांना माहितही नाही. नुकतीच संबंधित अधिकाºयांची भेट घेऊन मिनी थिएटरकडे प्राधान्याने लक्ष द्या, असे आम्ही सांगितले. उपवन तलावाजवळ अ‍ॅम्फी थिएटर उभारले; पण उपवन फेस्टिव्हल सोडून त्याचा किती उपयोग होतो? जे अ‍ॅम्फी थिएटर आधीपासून आहे त्याच्या दुरुस्तीकडे प्राधान्याने लक्ष द्यायला हवे. मिनी थिएटरमध्ये समस्या खूप आहेत. परंतु कलाकारांना विचारात न घेता पालिकेने दुरुस्तीचा निर्णय घेतला. काय समस्या आहेत, हे आम्हाला विचारले असते तर आम्ही ही सांगू शकलो असतो. - विजू मानेपालकमंत्र्यांना भेटणारआम्ही सर्व कलाकार पालकमंत्र्यांची भेट घेणार आहोत. मिनी थिएटरची नेमकी काय परिस्थिती आहे? काम सुरू झाले नाही? त्याची कारणे काय आहेत? डिसेंबर महिन्यात काम पूर्ण होईल, या दिलेल्या आश्वासनानुसार मिनी थिएटर पूर्ण दुरुस्त होईल का? दुरुस्तीमध्ये मिनी थिएटरच्या सर्वच समस्या सोडविणार का? सर्व्हे केला असेल तर नेमका काय सर्व्हे केला? अशा अनेक प्रश्नांसंदर्भात त्यांच्याशी बोलणार आहोत. रसिक प्रेक्षक, टॅगचे सदस्य आणि कलाकार म्हणून हे मिनी थिएटर चांगल्या अवस्थेत सुरू व्हावे, असेच वाटते. या थिएटरमध्ये टॅगचे कार्यक्रम, बालनाट्य, हौशी संस्थांचे प्रयोग होत असतात. पण जर हे थिएटरच दोन-तीन महिने बंद राहणार असेल, तर त्याला काही अर्थ नाही. चांगल्या अवस्थेत आणि योग्य वेळेत मिनी थिएटर पूर्ण झाले नाही तर ठाण्यातील रंगकर्मी आंदोलन उभारतील. - उदय सबनीस

टॅग्स :Strikeसंप