शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पावणेदहा कोटींच्या कामांना मंजुरी

By admin | Updated: April 24, 2017 02:17 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत नऊ कोटी ७४ लाख रुपये खर्चाच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत नऊ कोटी ७४ लाख रुपये खर्चाच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली. ‘अ’ प्रभागात खोदलेल्या कूपनलिकांची कामे झाली नसल्याने त्याला मंजुरी देऊ नये, असा आक्षेप भाजपा नगरसेविका उपेक्षा भोईर यांनी या वेळी घेतला. त्यावर, कामे प्रत्यक्षात झाली आहे की नाही, हे समितीच्या निदर्शनास आणावे, असे आदेश सभापती रमेश म्हात्रे यांनी दिले. मात्र, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक यांनी कामे झालेली असल्यानेच विषय मंजुरीला आणला असल्याचे स्पष्ट केले. मागील वर्षी पाणीटंचाई निवारणासाठी २५ कोटी रुपये खर्चाचा आराखडा महापालिकेने तयार केला होता. त्यानुसार, २७ गावे व ‘अ’ प्रभागातील काही गावांमध्ये कूपनलिका टाकून हॅण्डपंप बसवण्याचे काम करण्यात आले. त्याला मंजुरी देण्याचा विषय पटलावर आला असता भोईर यांनी त्याला हरकत घेतली. प्रत्यक्षात तेथे काम झालेले नसल्याचा आरोप केला. मात्र, काम झाल्याशिवाय विषय मंजुरीला कसा आणणार, असा खुलासा अभियंता पाठक यांनी केला. ‘ई’ प्रभागातही ८० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकणे, डोंबिवली पूर्वेतील सार्वजनिक वापराच्या विहिरीचा गाळ काढणे, दुरुस्ती करून घेणे, डोंबिवली ‘फ’ प्रभागात १० ठिकाणी कूपनलिका खोदणे, कल्याण पूर्वेतील ग्रामीण भागात हॅण्डपंप बसवणे, हे विषय पाणीपुरवठ्याशी संबंधित असल्याने त्याला सभापतींनी तातडीने मंजुरी दिली.महापालिकेने आमदार गणपत गायकवाड यांच्या आमदार निधीतून तीन शववाहिका व तीन घंटागाड्या खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. आंबिवली रोडवर पथदिवे लावले जाणार आहेत. त्यासाठी ५० लाखांच्या कामाला मंजुरी देण्यात आली. यापूर्वी त्याठिकाणी दिव्याची व्यवस्थाच नव्हती का, असा मुद्दा सदस्य अर्जुन भोईर यांनी उपस्थित केला. महापालिका रुग्णालयांना लॅबोरेटरी साहित्य पुरवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. अग्निशमन दलाची साधनसामग्री खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी ३८ लाख रुपये खर्च होणार आहे. डोंबिवलीतील शिवमंदिर स्मशानभूमीसाठीअतिरिक्त बर्निंग स्टॅण्ड खरेदी करण्यात येणार आहेत. जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमावर पाच लाख १० हजार रुपये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी उभारलेल्या मंडपावर दोन लाख ८७ हजार रुपये खर्च झाले आहेत. महापालिकेची प्रकल्प डॉक्युमेंटरी तयार करण्यासाठी सात लाखांचा खर्च झाला आहे. कल्याणमधील काळातलाव येथील बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी रोषणाई, एलईडी स्क्रीन, व्हिडीओ शूटिंग, जनरेटर यासाठी ३४ लाख रुपयांचा खर्च झाला. त्यालाही मंजुरी दिली आहे. (प्रतिनिधी)