शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

येऊर जंगलात ११ हरणांसह सांबर, रानडुक्करचा वावर!

By सुरेश लोखंडे | Updated: May 8, 2023 10:47 IST

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानास लागून असलेल्या येऊरच्या जंगलात तब्बल ११ हरणांसह ११ सांबर, सहा रानडुक्कर, २५ माकडांची नोंद झाली आहे.

सुरेश लोखंडे

ठाणे : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानास लागून असलेल्या येऊरच्या जंगलात तब्बल ११ हरणांसह ११ सांबर, सहा रानडुक्कर, २५ माकडांची नोंद झाली आहे. तर तुळशीविहार तलावाच्या परिसरात तब्बल तीन बिबट्यांची  नोंद रात्रीच्या मचाणावरील वन्यप्राणी गणनेत घेण्यात आली आहे.ठाणे   शहराला लागून असलेल्या संजय गांधी उद्यानाजवळ येऊर जंगल ठाणेकरांचे नैसर्गिक वैभव आहे. या जंगलात वास्तव्याला असलेल्या वन्यजीव प्राणी, पक्ष्यांची नोंदणी  ५ मे रोजी रात्री करण्यात आली. या दिवशी पौर्णिमेच्या चांदण्यारात्री संजय गांधी उद्यानासह येऊर वनपरिक्षेत्र विभागाच्या वनाधिकाऱ्यांनी या वन्यजीव प्राण्याची गणना केली. यात मनसोक्त मुक्त संचार करणाऱ्या बिबट्यांसह, हरिण, सांबर, माकड, मोर, लांडोर, घुबड, घार, कोल्हे, काळवीट, रानडुक्कर आदी विविध पक्षी, प्राण्यांची गणना बुद्धपौर्णिमेच्या रात्री मचाणावर बसून तब्बल ३६ वन अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केली. 

येऊरच्या जंगलास लागून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील तुळशी तलाव परिसरात तीन बिबट्यांची नोंद घेतली आहे. तहानेने व्याकूळ झालेले बिबटे रात्रीच्या अंधारात पाणी पिण्यासाठी बाहेर पडले असता त्यांची नोंद प्राणी गणनेत करण्यात आली आहे. 

त्यांच्या या जागा हेरून येऊन वन अधिकाऱ्यांनी नदी, नाल्याच्या काठावरील पाणवठा म्हणजे येऊरमधील करंदीचे पाणी, चेणा नदी, वळकुंडीचे पाणी, टाकाचा नाला, आंब्याचे पाणी, चांभारखोंडा नाला, चिखलाचे पाणी, हुमायून बंधारा, माकडाचे पाणी, जांभळी, करवेल, तलवळी आणि कोरलाईच्या पाणवठ्यावर मचाण बांधल्या होत्या.

दिवसभर कडकडीत उन्हात दडून बसलेले व तहानेने व्याकूळ वन्य प्राणी, पक्षी रात्री पाणी पिण्यासाठी बाहेर पडतात. वैशाखाच्या या कडकडीत उन्हाळ्यात ते पाण्यावाचून जास्त काळ राहू शकत नाही. त्यामुळे ते ठरलेल्या पाणवठ्यावर रात्री पाणी पिण्यासाठी दररोज येतात. 

येऊरच्या जंगलात 

हरिण, सांबर, रानडुक्कर, लंगूर आणि माकडांची नोंद  केली आहे. यासाठी जंगलातील पाणवठे, झरे, पाणथळ, पाण्याचे डोह, डबके, तलाव आदी ठिकाणी झाडझुडपात, झाडांवर मचाण बांधले होते. त्यावर रात्रभर बसून वनाधिकारी, कर्मचाऱ्यांनी या प्राण्यांची गणना केली आहे. पिण्यासाठी आलेल्या या प्राण्यांची, पक्ष्यांची नोंद अधिकाऱ्यांनी घेतली.