शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी महापालिका शाळांच्या दुरुस्तीसाठी समाजवादीचे शिक्षण मंत्र्यांना साकडे

By नितीन पंडित | Updated: October 5, 2023 19:24 IST

भिवंडी शहरातील बाराहून अधिक प्राथमिक शाळा इमारती या नादुरुस्त झाल्या असून त्यामुळे काही शाळा इमारती बंद करण्यात आल्या आहेत,तर काही शाळा इमारती लवकरच बंद होणार आहेत.

भिवंडी :भिवंडी महापालिका शिक्षण मंडळाच्या प्राथमिक शाळा इमारतींची दुरावस्था झाली असून या शाळेमधील शिक्षण घेणाऱ्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या सोयी सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याने या बाबींकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे याकरता  समाजवादी पक्षाचे प्रदेश सचिव रियाज आजमी व भिवंडी शहरातील पक्ष पदाधिकारी माजी नगर सेवक फराज बहाउद्दीन बाबा, रियाज शेख,आलमगीर खान यांच्या शिष्टमंडळाने प्रदेश अध्यक्ष आमदार अबू आसिम आजमी यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेत त्यांच्याकडे येथील शाळांच्य  दुरुस्तीचा मुद्दा मांडला.

भिवंडी शहरातील बाराहून अधिक प्राथमिक शाळा इमारती या नादुरुस्त झाल्या असून त्यामुळे काही शाळा इमारती बंद करण्यात आल्या आहेत,तर काही शाळा इमारती लवकरच बंद होणार आहेत.त्यामुळे अशा शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या गरीब व कामगार वस्तीतील गरजू विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय होण्याची चिन्ह दिसून येत असून विद्यार्थ्यांचे भविष्य चुकीच्या मार्गाने जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.या सर्व बाबी लक्षात घेऊन भिवंडी पालिका हद्दीतील सर्व शाळा इमारतींची दुरुस्ती करण्यासाठी शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी या शिष्टमंडळाच्या वतीने रियाज आजमी यांनी केली आहे.

निज़ामपुर परिसरात असलेल्या पालिका शाळा इमारती धोकादायक झाल्याचे घोषित करून तेथील सुमारे १२०० विद्यार्थ्यांना विविध शाळांमध्ये स्थलांतरीत केले आहे. त्या मुळे हे विद्यार्थी शाळेत जाण्यास तयार नाहीत . त्यामुळे पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती होत आहे अशी चिंता माजी नगरसेवक फराज बहाउद्दीन बाबा यांनी व्यक्त केली.

पालिकेची आर्थिक परिस्थिती चिंताजनक असल्याने शाळा इमारती दुरुस्ती व नव्याने उभारण्यासाठी निधी नसल्याने शाळा बंद केल्या जाण्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्या साठी राज्य शासनाने इमारत उभारणी साठी निधी तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी रियाज आजमी यांनी केली आहे.  पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी बेंचेस नाहीत,स्वच्छ पिण्याचे पाणी ,शौचालय या सुविधा मिळत नसल्याची तक्रार केली गेली.या शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर लवकरच आपण भिवंडी शहराला भेट देऊन तेथील परिस्थिती समजून घेऊन शासनाकडून योग्य त्या निधीची तरतूद करू असे आश्वासन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिष्टमंडळास दिले आहे.

 

टॅग्स :bhiwandiभिवंडीAbu Azmiअबू आझमी