शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी महानगरपालिकेवर समाजवादी पार्टीचे जल आक्रोश आंदोलन; शेकडो नागरिक सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2022 18:53 IST

शहरातील फातमा नगर नूरी नगर, शांतीनगर, खंडू पाडा या भागात पाणी पुरवठा अनियमित होत असून अनेक विभागात मध्यरात्री नंतर पाणी पुरवठा केला जात असून त्या विरोधात नागरिकांमधून सतत ओरड होत आहे.

नितिन पंडीत

भिवंडी - महानगरपालिका लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ बुधवारी संपत असतांनाच समाजवादी पार्टी भिवंडी शहराध्यक्ष रियाज आजमी यांच्या नेतृत्वाखाली पालिकेवर जल आक्रोश मोर्चा काढून पाणी समस्ये बाबत जोरदार घोषणाबाजी करीत धरणे आंदोलन केले.

शहरातील फातमा नगर नूरी नगर, शांतीनगर, खंडू पाडा या भागात पाणी पुरवठा अनियमित होत असून अनेक विभागात मध्यरात्री नंतर पाणी पुरवठा केला जात असून त्या विरोधात नागरिकांमधून सतत ओरड होत आहे. शहरात नागरीकांसाठी समान पाणीपुरवठा धोरण राबवावे ,स्वच्छ पिण्याचे पाणी द्यावे ,काही ठिकाणी अस्वच्छ पाणी दिले जाते .स्टेम कडून मिळणारे ७५ एमएलडी पाणी हे शहरातील वेगळ्या नागरी वस्तीत दिले जाते ,तर अशुद्ध पाणी झोपडपट्टी विभागात दिले जाते ही गोरगरीब जनतेची फसवणूक होत आहे.तर शहरात शंभर कोटी रुपये खर्च करून केलेल्या पाणीपुरवठा योजनेतील १९ पैकी आज ही १४ पाण्याच्या टाक्या सुरू करण्यात प्रशासनास अपयश आले असून या बाबत तात्काळ निर्णय घेऊन प्रशासनाने पाणी पुरवठा सुनियोजित पद्धतीने होण्याची मागणी शहराध्यक्ष रियाज आजमी यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे .

यावेळी शहराध्यक्ष रियाज आजमीसह समाजवादीचे पदाधिकारी रियाज ताहीर,जावेद अन्सारी ,हमीद शेख ,फारुख अन्सारी ,आलमगीर खान ,जुबेर शेख ,सुग्गी देवी यादव यांचे शिष्टमंडळ आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांना निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळ मुख्यालयात गेले असता त्यांना सुरवातीला आयुक्तांनी व्यस्तते मुळे भेट नाकारली असता शिष्टमंडळाने आयुकांच्या दालनाबाहेर बैठक मारून घोषणाबाजी सुरू केली .अर्ध्या  तासाने अवघ्या काही मिनिटांसाठी वेळ दिल्यानंतर निवेदन स्वीकारून आयुक्तांनी आंदोलनकर्त्यांचे समाधान केले .या प्रसंगी पोलिसांनी प्रवेशद्वारासह मुख्यालयात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता .