शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत बोगस खतांची विक्री; खत पाण्यात न विरघळता बनले प्लास्टिकचे बोळे

By नितीन पंडित | Updated: August 3, 2023 17:29 IST

शेतकऱ्याने शेतात टाकलेले खत पाण्यात न विरघळत चक्क प्लास्टिकचे गोळे बनल्याने हा आश्चर्यकारक प्रकार पाहून येथील शेतकरी हैराण झाले आहेत.

भिवंडी: भिवंडीत बोगस खत विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. शेतकऱ्याने शेतात टाकलेले खत पाण्यात न विरघळत चक्क प्लास्टिकचे गोळे बनल्याने हा आश्चर्यकारक प्रकार पाहून येथील शेतकरी हैराण झाले आहेत. याप्रकरणी त्रस्त शेतकऱ्याने गुरुवारी तहसीलदार अधिक पाटील यांच्याकडे निवेदन सादर करून बोगस खत विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आवश्यक असलेल्या खतांचा पुरवठा शासनाच्या अधिकृत कृषी सेवा केंद्रातून  होत असताना अंबाडी परिसरातील शेतकऱ्यांना विक्री केलेली खते ही बोगस असल्याची व त्यासोबतच खतांच्या किमतीपेक्षा अधिक पैसे घेतल्याची तक्रार शेतकऱ्यांनी तहसीलदारांना देत दिलेल्या निवेदनात केले आहे.

अंबाडी ,दाभाड,दिघाशी या परिसरात मोठ्या प्रमाणावर आज ही भात शेती मोठ्या प्रमाणावर केली जात आहे.तेथील असंख्य शेतकऱ्यांनी दाभाड येथील पल्लवी कृषी सेवा केंद्रातून १८:१८:१० हे खत खरेदी केले होते.परंतु मागील काही दिवसात झालेल्या पावसात शेतात टाकलेले खत हे पाण्यावर तरंगताना दिसले.त्यामुळे शेतकरी शिवाजी राऊत यांनी शंका घेऊन तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली.त्यानंतर कृषी अधिकारी राहुल शिरसाड,पंचायत समिती कृषी अधिकारी निता गवळी व अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर पाहणी केली असता खत विक्री दुकानातील प्रतिनिधी ज्ञानेश्वर काचवे यांनी सुध्दा खत पाण्यावर तरंगत असल्याचे जबाबात मान्य केले आहे.

भात लागवड जोमाने व्हावी यासाठी शेतकरी पदरमोड करून खत खरेदी करीत आहे पण ते बोगस निघाल्याने त्याचा परिणाम शेती उत्पन्ना  वर होणार असल्याने शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानास कोण जबाबदार राहणार असा सवाल शेतकरी शिवाजी राऊत यांनी निवेदनात उपस्थित केला आहे.तर या भागात युरिया खत हे शासनाने जाहीर केलेल्या किमतीपेक्षा अधिक किमतीला विक्री केले जात असल्याची तक्रार देखील शिवाजी राऊत यांनी तहसीलदार अधिक पाटील यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी