शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
4
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
5
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
6
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
7
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
8
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
9
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
10
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
11
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
12
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
13
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
14
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
15
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
16
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
17
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
18
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
19
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
20
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी

मेडीकलमधून नशेच्या औषधांची विक्री

By admin | Updated: January 22, 2016 02:03 IST

बोगस डॉक्टरांप्रमाणे पालघर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये आता बोगस फार्मासिस्ट पदव्या मिळवून अनेक मेडिकल स्टोअर्स उघडण्यात आली आहेत.

शशी करपे,  वसईबोगस डॉक्टरांप्रमाणे पालघर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये आता बोगस फार्मासिस्ट पदव्या मिळवून अनेक मेडिकल स्टोअर्स उघडण्यात आली आहेत. नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांची बंदी असूनही खुलेआम विक्री होत आहे. तर नार्कोटीक्सची मात्रा असलेली औषधे विना परवाना विकण्याचे काम अनेक मेडिकल स्टोअर्समधून केले जात आहे. या दुकानांवर अंकुश ठेवण्यासाठी असलेल्या एफडीएकडे मनुष्यबळ कमी असल्याने मेडिकल स्टोअर्समधून गोरख धंदा रोजरोसपणे सुुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले. वसई-विरार परिसरात तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर नशेच्या आहारी जात असल्याचे दिसत असताना आता केमिस्ट दुकानदारांकडून नशेची औषधे विकली जात असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पालघर जिल्ह्यात आठ हजारांहून अधिक मेडिकल स्टोअर्स आहेत. त्यांच्यावर अंकुश ठेवण्यात एफडीए अर्थात अन्न व औषध प्रशासन मनुष्यबळा अभावी तोकडे पडत असल्याने मेडिकल स्टोअर्सच्या आडून सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळले जात आहे, त्याचबरोबर नशेसाठी वापरण्यात येणारी बंदी असलेली औषध खुलेआम विकली जात असल्याचे केमिस्ट परिवार न्यूज या मेडिकल स्टोअर्सच्या नव्याने स्थापन झालेल्या संघटनेकडून करण्यात आला आहे. जिल्ह्यात अनेक केमिस्ट दुकानांमध्ये बोगस फार्मासिस्टचा सुळसुळाट झाला आहे. फार्मासिस्टची बोगस पदवी अवघ्या साठ हजार रुपयांमध्ये मिळत असल्याचा संघटनेचा आरोप आहे. पदवीची पडताळणी आणि शहानिशा करण्यासाठी सरकारकडे सक्षम यंत्रणा नसल्याने बोगस पदव्यांचा सुळसुळाट झाल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे कर्नाटक, राजस्थान, तामिळनाडू, बंगलोर आदी ठिकाणाच्या असलेल्या बोगस पदव्या विशिष्ट समाजाच्या लोकांकडेच असल्याचेही उजेडात आले आहे. इंडियन फार्मसी कौन्सिलकडे या पदव्यांची नोंदणी केल्यानंतर केमिस्ट स्वत:चा व्यवसाय सुुरु करतो. त्या विशिष्ट समाजातील बड्या व्यापाऱ्यांचे कौन्सिलमध्येही वजन असल्याने बोगस पदव्यांची शहानिशा न करताच नोंदणी होत असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, बोगस पदव्यांचा विषय ऐरणीवर आला असताना अनेक केमिस्ट दुकानांमध्ये बंदी असलेली आणि नशेसाठी वापरात आणली जाणारी औषधे डॉ्नटरांच्या चिठ्ठीशिवाय सर्रासपणे विकली जात असल्याची संघटनेची तक्रार आहे. नार्कोटिस्टची मात्रा असलेली औषध विकण्यासाठी शेड्युल्ड ए्नस परवाना घ्यावा लागतो. पालघर जिल्ह्यात हा परवाना अवघ्या दीडशे-दोनशे केमिस्ट दुकानदारांकडे आहे. असे असताना ही औषधे विकली जात आहेत. गेल्या महिन्यात एफडीएने नालासोपारा शहरातील विवान मेडिकल आणि रिगल मेडिकल स्टोअर्सवर छापा मारून तब्बल सहा लाखांचा औषधांचा साठा जप्त करून दोन्ही दुकानांच्या मालकाला अटक केली होती. सध्या दोन्ही दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. अशी औषधे गुजरातहून आणली जात असल्याचे पोलीस तपासात उजेडात आले आहे. अवघ्या ६० हजार रुपयांमध्ये बोगस पदव्या मिळत असून एफडीएने शोध मोहिम हाती घेतली पाहिजे. अनेक केमिस्ट बंदी असलेली औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विकतात. डॉक्टर सरकारने ठरवून दिल्याप्रमाणे प्रिस्क्रीप्शनपमाणे औषधे लिहून देत नाहीत. कंपन्यांची मोठी प्रलोभने असल्याने डॉक्टर ठराविक औषध लिहून देत असतात. यावर निर्बंध आणि अंकुश आणला तरच केमिस्टमधील भष्टाचार थांबू शकेल. - दीपंकर पाटील, अध्यक्ष, केमिस्ट परिवारफार्मसिस्टच्या पदव्या तपासण्याचा आम्हाला अधिकार नाही. आम्ही केमिस्ट दुकानांची नियमित तपासणी करीत असतो. तसेच दुकानदारांकडून सेल्फ इन्सफेकशन रिपोर्ट मागवला जातो. त्यात अनियमितता अथवा त्रुटी आढळून आल्या की परवाने निलंबित करीत असतो. नार्कोटीक्स परवाना आहेत अशाच दुकानदारांना नार्कोटीक्सची मात्रा असलेली औषधे विकण्याचा अधिकार आहे. अन्यथा कडक कारवाई केली जाते. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे विकण्यास मनाई असल्याने दुकानदारांवर वचक बसला आहे.- गिरीश हुकरे, सह आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, ठाणे.