शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पगार महापालिकेचा, कामे मात्र इतर आस्थापनांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 00:23 IST

उल्हासनगरमधील प्रकार; कुणी दिला होता आदेश? ७० टक्के अधिकाऱ्यांची पदे रिक्त

उल्हासनगर : महापालिकेत अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असताना तब्बल १४ कर्मचारी मंत्रालय, उल्हासनगर, अंबरनाथ तहसील व कल्याण पूर्व विधानसभेसाठी वर्षानुवर्षे काम करीत असल्याचे उघड झाले. पगार महापालिकेचा, कामे इतरांची का, असा प्रश्न उपस्थित झाल्यावर, कर्मचाऱ्यांना परत बोलावणार असल्याची प्रतिक्रिया उपायुक्त मदन सोंडे यांनी दिली.उल्हासनगर महापालिकेत ७० टक्के अधिकारी व ४० टक्क्यांपेक्षा कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. प्रतिनियुक्तीवरील अधिकारी मिळत नसल्याने वर्ग-१ व २ च्या पदावर कनिष्ठ व वरिष्ठ लिपिकांची वर्णी लावण्याची वेळ प्रशासनावर आली होती. महापालिका आस्थापनेवरील १४ कर्मचारी यांना संबंधित विभागाचा कोणताही अधिकृत आदेश नसताना मंत्रालयात मधुरा केणी, सुनील वलेचा, गौरव जेधे तर कल्याण पूर्व विधानसभा कामासाठी रवींद्र दंगगव्हाळ, विशाल ढोले, सुधाकर पाटील, उल्हासनगर तहसील कार्यालयात दीपक कानोजिया, संदीपान जाधव, किशोर अल्हाट, शरद पाटील, अशोक छोकर तसेच अंबरनाथ तहसीलमध्ये साईनाथ चौधरी, अजय जाधव व अनिकेत आदी वर्षानुवर्षे काम करीत आहेत. महापालिकेचा पगार घेणारे हे कर्मचारी २०११ नंतर अन्य आस्थापनात काम करीत आहेत. पालिकेचा पगार घेणारे कर्मचारी कुणाच्या आदेशानुसार दुसरीकडे काम करीत आहेत, असा प्रश्न विचारला जात असून विभागासह महापालिकेचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.कर्मचाऱ्यांना परत बोलावणारमहापालिकेचे १४ कर्मचारी वर्षानुवर्षे मंत्रालय, कल्याण पूर्व विधानसभा, उल्हासनगर व अंबरनाथ तहसील कार्यालयात काम करीत आहेत. मात्र महापालिका सर्वांचे पगार काढत असून त्यांना पुन्हा महापालिका आस्थापनावर परत बोलावणार आहे. तसेच याबाबत संबंधित संस्थेकडून अधिकृत आदेश होता का, याबाबतही तपास करून कारवाई करण्यात येणार आहे, असे उपायुक्त मदन सोंडे यांनी सांगितले.