शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

साईशक्ती दुर्घटना; सरकारकडून मृतांच्या नातेवाइकांना पाच लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 06:42 IST

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

उल्हासनगर : कॅम्प नं. २, नेहरू चौक येथील साईशक्ती या पाच मजली इमारतीचा स्लॅब शुक्रवारी रात्री ९.३० वाजता तळमजल्यापर्यंत कोसळून ७ जणांचा मृत्यू, तर १ जण जखमी झाला. इमारतीचा मध्यरात्रीपर्यंत ढिगारा उचलण्यात आला. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत सरकारच्या वतीने जाहीर केली. दरम्यान, इमारतीचे स्लॅब कोसळून १५ दिवसांत १२ जणांचे मृत्यू झाले आहेत.कॅम्प नं. २ मधील साईशक्ती इमारतीच्या पाचव्या मजल्याचा स्लॅब शुक्रवारी रात्री तळमजल्यावर पडून ढिगाऱ्याखाली ७ जण दबल्याची माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख बाळू नेटके व सहायक आयुक्त गणेश शिंपी यांना मिळाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी ढिगाऱ्याखालून ५ जणांचे मृतदेह काढल्यानंतर त्यांच्या मदतीला टीडीआरएफची टीम आली. त्यांच्या मदतीने आणखी दोन मृतदेह बाहेर काढले. असे एकूण ७ जणांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून काढण्यात आले, असे सांगण्यात आले, तर एक जण जखमी झाला. त्यानंतर प्रभाग अधिकारी गणेश शिंपी यांनी इमारत सील केली. यावेळी घटनास्थळी पालकमंत्री शिंदे, आमदार कुमार आयलानी, आयुक्त डॉ. राजा दयानिधी आदी उपस्थित होते.जखमी व्यक्तीला मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याचे नाव अलगोत नायडर (६०) आहे, तर मृत्यू झालेल्यांमध्ये पुनीत चांदवानी (१७), दिनेश चांदवानी (३५), दीपक चांदवानी (४२), मोहिनी चांदवानी (६५), कृष्णा इनूचंद बजाज (२४), नम्रता मूलचंद बजाज (२१) व लवली बजाज (४६) यांचा समावेश आहे. चांदवानी कुटुंब इमारतीच्या पाचव्या मजल्यावर, तर बजाज कुटुंब पहिल्या मजल्यावर राहत होते. फ्लॅट ३०४ व ४०४ हे रिकामे होते, तर २०२ फ्लॅटमधील रहिवासी बेडरूममध्ये होते, अशी माहिती शिंपी यांनी दिली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांशी बोलून शहरातील धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी या वेळी दिले. उल्हासनगरात १९९२ ते ९६ दरम्यान रेती बंद असल्याने बहुतांश बांधकामे दगडाच्या बारीक चुऱ्यातून झाली आहेत. याचदरम्यान बांधण्यात आलेल्या बहुतांश इमारतींचे स्लॅब कोसळून बळी जात आहेत.  इमारतीमधील १५ कुटुंबे थारासिंग दरबारातसाईशक्ती इमारत पालिकेने रात्री सील केली. एकूण २९ फ्लॅटपैकी अर्धेअधिक फ्लॅट हे रिकामे असून, इतर कुटुंबांची थारासिंग दरबारमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे. दागिने, संसारोपयोगी वस्तू काढण्यासाठी बेघर झालेल्या कुटुंबांना शनिवारी परवानगी देण्यात आली.