शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

साई पक्षाचे भाजपत विलीनीकरण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 00:41 IST

उल्हासनगर महापौर निवडणूक; शिवसेना, ओमी टीमला शह देण्याचा प्रयत्न

- सदानंद नाईक उल्हासनगर : महापौर निवडणुकीच्या तोंडावर साई पक्षाचे माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपत विलीनीकरण होत आहे. मात्र साई पक्षाच्या काही नगरसेवकांत याबाबत नाराजी असून साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी यांनी विलीनीकरणाची कबुली दिली आहे.उल्हासनगर महापौरपदाची निवडणूक शुक्र वारी २२ नोव्हेंबर रोजी दुपारी होत आहे. भाजप-ओमी टीमचे ३१ तर साई पक्षाचे १२ असे एकूण ४३ नगरसेवक भाजप आघाडीकडे आहेत. महापौर विजयी होण्याकरिता ४० नगरसेवकांची आवश्यकता आहे. विरोधी पक्षातील शिवसेनेकडे २५, राष्ट्रवादी काँग्रेस चार, रिपाइंचे तीन, काँग्रेस, पीआरपी व भारिपचे प्रत्येकी एक असे एकूण ३५ नगरसेवक आहेत. मात्र, भाजपतील ओमी टीम समर्थक सातपेक्षा जास्त नगरसेवक भूमिगत झाल्याने, भाजप आघाडीतील तणाव वाढला आहे. त्यामुळे साई पक्षाचे भाजपत विलीनीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. साई पक्षाच्या १२ पैकी काही नगरसेवक या निर्णयामुळे नाराज असून साई पक्षात फूट पडण्याची भीती आहे. भाजपतील ओमी टीम समर्थक नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याने भाजप वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पालिकेवर भगवा फडकवण्यासाठी भाजपतील ओमी टीम समर्थक नगरसेवक फोडल्याची चर्चा आहे.शिवसेनेचा डाव मोडून काढण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. ओमी समर्थक नगरसेवकांसह ३१ नगरसेवकांना व्हिप जारी केला आहे. व्हिप झुगारून मतदान केल्यास नगरसेवकांवर कारवाईचे आदेश रवींद्र चव्हाण यांनी दिले. भाजपचा महापौर निवडून आणण्यासाठी चव्हाण गेल्या दोन दिवसांपासून शहरात ठाण मांडून बसले आहेत. ओमी टीम समर्थक नगरसेवक भाजप नेत्यांच्या संपर्कात येऊ नये, यासाठी शिवसेनेने खबरदारी घेतली आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरMuncipal Corporationनगर पालिकाBJPभाजपा