शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

भाईंदरमधील सचिन तेंडुलकर मैदान बनले मद्यपी, व्यसनींचा अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 00:18 IST

पालिका प्रशानाचे दुर्लक्ष; हिरवळीवरील लाखोंचा खर्च गेला वाया

भाईंदर/ मीरा रोड : भाईंदर पूर्वेच्या सरस्वतीनगर येथील सचिन तेंडुलकर मैदान व जवळच्या यशवंतराव चव्हाण उद्यानातील दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. तेंडुलकर मैदान तर मद्यपी, व्यसनींचा अड्डाच बनला असून हिरवळीसाठीचा ४२ लाखांचा खर्च गेला कुठे असा प्रश्न केला जात आहे. परंतु पालिकेसह पोलिसांकडूनही या समस्यांकडे गांभीर्याने पाहिले जात नसून नगरसेवकही पालिकेकडे बोटे दाखवत आहेत.सरस्वतीनगर, साईबाबानगरच्या नागरिकांसाठी यशवंतराव चव्हाण हे पहिले उद्यान २०१० मध्ये पालिकेच्या माध्यमातून बांधण्यात आले. या उद्यानातील कारंजे बंद अवस्थेतच आहे. येथील प्रवेशद्वार जाहिराती लाऊन विद्रुप केले गेले आहे. लहान मुलांना खेळण्याच्या जागी वाळू नसल्याने पावसात चिखल झाला आहे. योगासाठी स्वतंत्र शेडची नागरिकांची मागणी असूनही पालिका त्याकडे डोळेझाक करत आहे. अनेकवेळा दिवेही बंद असतात.सर्वात भयाण अवस्था लागूनच असलेल्या सचिन तेंडुलकर मैदानाची झालेली आहे. या ठिकाणी दिवस - रात्र मद्यपी व व्यसनींचा राबता असतो. पालिकेने बसवलेला रखवालदार तर कूचकामी ठरला आहे. येथे खेळण्यासाठी येणारी मुलेच मैदानातील दारूच्या बाटल्या उचलणे , दगड बाजूला करणे आदी कामे करतात.पालिकेने बांधलेले स्वच्छतागृह तर अस्वच्छतेचे माहेरघर आहे. आत पाणी नसल्याने दुर्गंधी असते. आतील साहित्याची तोडफोड करण्यात आली आहे. याआधीही महापालिकेने हिरवळीसाठी लाखो रूपये खर्च केले आहेत. परंतु मैदानात कार्यक्रमांसाठी मंडप आदी टाकण्याची परवानगी पालिकाच देते.मद्यपींबाबत पालिका व पोलिसांकडे सतत तक्रारी केल्या आहेत. मैदानात ४२ लाख खर्चूनही गवत नसल्याची तक्रार आयुक्त्तांकडे केली आहे. प्रशासनाने गांभीर्याने घेतले नाही तर शेवटी पालिकेवर मोर्चा काढू आणि आयुक्तांच्या दालनात मुले खेळतील.- नीलम ढवण, नगरसेविकारहिवाशांना एकही उद्यान व मैदान नव्हते. आपण पाठपुरावा करून ते पालिकेमार्फत करुन घेतले. त्यात माझा नगरसेवक निधीही दिला आहे. दैनंदिन देखभाल व सुरक्षेसाठी आपण पालिकेला नेहमीच तक्रारी केल्या आहेत. परंतु पालिका आणि पोलीस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे.- दिनेश नलावडे, नगरसेवक

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक