शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण विद्यार्थीही करणार अवकाश दर्शन

By admin | Updated: May 3, 2017 05:30 IST

विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी व त्यातून चिकीत्सक वृत्ती व वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण व्हावा म्हणून इंडियन वुमेन

नरेश पाटील / लोनाडविद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी व त्यातून चिकीत्सक वृत्ती व वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण व्हावा म्हणून इंडियन वुमेन अ‍ॅन्ड चिल्ड्रेन फाऊंडेशन ही संस्था अ‍ॅमेझॉन केअर्स सीएसआर प्रकल्पांतर्गत विविध उपक्र म राबवित आहे. या अंतर्गत कुरु ंद येथील जिल्हा परिषद शाळेत नुकतेच सुसज्ज तारंगणाचे उद्घाटन झाले. मागील वर्षी भाभा अणूसंशोधन केंद्रात विद्यार्थ्यांना विविध प्रयोग पाहण्याची संधी दिली. तर या वर्षी १८ शाळांमधील सुमारे १८०० विद्यार्थ्यांना नेहरू तारांगण व नेहरू विज्ञान केंद्र येथे प्रयोग दाखवण्यात आले. कुरूंद येथील आदर्श विद्यालय व आमणे येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे दरमहा विज्ञान प्रयोगाचे प्रात्यक्षिक आणि मार्गदर्शन शिबिर घेण्यात येते. हे सर्व उपक्र म राबवल्यावर संस्थेच्या निदर्शनास आले की विद्यार्थ्यांचे खगोलाच्या संकल्पना स्पष्ट झालेल्या नाहीत. प्रत्येक विद्यार्थी मुंबईला नेहरु तारांगणात जाऊन माहिती मिळवू शकत नाही .हे सर्व लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या कुरूंद येथील शाळेत तारांगण तयार केले असून त्याचे उद्घाटन नुकतेच झाले. १५ बाय १० फुटाचा स्क्र ीन असलेल्या या तारांगणात एकावेळी २५ विद्यार्थी, शिक्षकांना प्रवेश देण्यात येईल. विविध खगोलीय घटना व माहिती त्रिमितीय चित्रफितीद्वारे दाखवण्यात येईल. हे तारांगण विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी मोफत असणार आहे. प्रवेशाबाबतचे नियम,नोंदणीपद्धत व संपर्कक्र मांक लवकरच जाहीर करण्यात येतील. एखाद्या जिल्हा परिषद शाळेतील हे पहिलेच तारंगण असावे. यासाठी अ‍ॅमेझॉन केअर्स च्या सीएसआर लीड मनीषा पाटील व आयडब्ल्यूसीएफचे अध्यक्ष प्रभाकर जाधव यांचे सहकार्य मिळाले. संस्थेचे प्रोजेक्ट कोआॅर्डिनेटर सारिपुत्र साळवे व त्यांच्या पथकाने विशेष मेहनत घेऊन हे तारांगण तयार केले आहे. विविध देशातील मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले.वेळापत्रक मिळणारशाळा सुरू होण्यापूर्वी वेळापत्रक मिळणार १५ जूनला शाळा सुरु होण्यापूर्वी वेळापत्रक व संपर्कक्र मांक जाहीर करण्यात येईल असे अध्यक्ष प्रभाकर जाधव, सचिव अलंकार वारघडे यांनी सांगितले.