शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण रुग्णांना मिळणार अद्ययावत आरोग्य सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 23:39 IST

एडवण आरोग्य केंद्र सुसज्ज : २५-३० हजार नागरिकांना लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क पालघर : सफाळे परिसरातील रुग्णांच्या उपचारासाठी चांगल्या सोयी-सुविधा असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत आता एडवण येथे लोकार्पण करण्यात आल्याने परिसरातील २५ ते ३० हजार नागरिकांना त्याचा लाभ होणार आहे. सफाळे परिसरातील एडवण पंचक्रोशी परिसरात शासकीय आरोग्य सुविधांची वानवा असल्याने चांगली आरोग्य सेवा असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र मिळावे, अशी मागणी होती. 

 

या गटातून निवडून आलेले तत्कालीन जिल्हा परिषदेचे सभापती दामोदर पाटील यांनी एडवण प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश येत गुरुवारी हे आरोग्य केंद्र नागरिकांसाठी खुले करण्यात आले. सुमारे चार कोटी ८० लाख रुपये खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्रासह कर्मचारी वसाहत निर्माण करण्यात आली आहे. कोकणातील हे दुसऱ्या क्रमांकाचे प्राथमिक आरोग्य केंद्र असणार आहे. येथे लहान शस्त्रक्रिया केल्या जाणार असून प्रसूतिगृहही अद्ययावत केले आहे. दोन-तीन आरोग्य अधिकाऱ्यांसह परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी आदी कर्मचारी उपलब्ध राहणार आहे. 

या केंद्राची रुग्णवाहिका निर्लेखित केली असली तरी आरोग्य विभागामार्फत भाडेतत्त्वावर वाहन ठेवून येथे रुग्णवाहिकेची सोय करून दिलेली आहे. हे केंद्र १० खाटांचे असून बाह्यरुग्ण व आंतररुग्ण विभाग सुरू राहणार आहे. परिसरातील १० उपकेंद्रांना जोडले गेलेले हे प्राथमिक आरोग्य केंद्र असणार आहे. खाजगी आरोग्यसेवेपेक्षाही चांगली सेवा या प्राथमिक केंद्रातून यापुढे नागरिकांना देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी यांनी सांगितले. या वेळी पालघर जि.पच्या आरोग्य समितीची बैठक या केंद्रात पार पडली. त्या वेळेला छोटेखानी कार्यक्रमात हे आरोग्य केंद्र सामान्य नागरिकांसाठी खुले करण्यात आल्याचे घोषित करण्यात आले. 

जनतेच्या आरोग्य सुविधांसाठी अशी सुसज्ज आरोग्य केंद्रे भविष्यात उभारण्यात येत असल्याने जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी येऊन नागरिकांना त्यामार्फत चांगली सेवा पुरवू शकू. याचा आनंद आहे.  - नीलेश सांबरे, उपाध्यक्ष तथा सभापती आरोग्य, जि. प. पालघर