शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
5
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
6
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
7
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
8
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
9
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
10
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
11
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
12
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
13
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
14
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
15
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
16
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
17
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

श्रेयासाठी धावलात, पण मोराची गाडी कधी धावणार? बच्चे कंपनीचा हिरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 6:35 AM

शहरातील बच्चे कंपनीसाठी प्रमुख आकर्षण असलेली मोराची गाडी पावसाळ््यापूर्वी नव्या स्वरूपात सुरू झाली खरी, पण सात ते आठ महिन्यांपासून ती बंदच आहे. नव्या गाडीचा शुभारंभ करताना राज्यमंत्री रवींद्र चव्हाण व भाजपाच्या पदाधिका-यांनी उपस्थिती लावली होती.

डोंबिवली : शहरातील बच्चे कंपनीसाठी प्रमुख आकर्षण असलेली मोराची गाडी पावसाळ््यापूर्वी नव्या स्वरूपात सुरू झाली खरी, पण सात ते आठ महिन्यांपासून ती बंदच आहे. नव्या गाडीचा शुभारंभ करताना राज्यमंत्री रवींद्र चव्हाण व भाजपाच्या पदाधिकाºयांनी उपस्थिती लावली होती. पण सध्याचे ‘वास्तव पाहता श्रेयासाठी धावलात, पण मोराची गाडी कधी धावणार?,’ असा सवाल उपस्थित होत आहे. मनसेचे डोंबिवली शहरअध्यक्ष मनोज घरत यांनी तर बुलेट ट्रेनचे स्वप्ननंतर दाखवा, पण साधी मोराची गाडी तरी आधी सुरू करा, असा टोला सत्ताधारी शिवसेना-भाजपाला लगावला आहे.पूर्वेतील नेहरू रोडवरील छत्रपती शिवजी महाराज उद्यानात १९९० च्या दशकात मोराची गाडी सुरू करण्यात आली. केडीएमसीचे हे उद्यान या भागातील आबालवृद्धांना फेरफटका मारण्यासाठी तसेच तरु णाई व लहान मुलांच्या विरंगुळ्याचे हक्काचे ठिकाण मानले जाते. या उद्यानातील मोराच्या गाडीची रपेट मारण्यासाठी लहानग्यांच्या अक्षरश: रांगा लागायच्या. परंतु, गेल्या काही वर्षांत पुरेशी देखभाल आणि दुरु स्ती होत नसल्याने ही गाडी बंद करण्यात आली. दोन वर्षांपूर्वी दुरु स्ती अभावी ही गाडी रडतखडतच सुरू होती, अखेर कालांतराने ती बंद करण्यात आली. ही गाडी बंद असल्याच्या निषेधार्थ मनसेने महापालिकेच्या अधिकाºयांना मोरपीस भेट दिले होते. त्यानंतर ही गाडी दुरुस्त करून नव्या रूपात आणण्यात आली. या गाडीला इंजिनाच टचही देण्यात आला. याच्या शुभारंभप्रसंगी चव्हाण, नगरसेवक संदीप पुराणिक यांच्यासह अन्य भाजपाच्या पदाधिकाºयांनी उपस्थिती लावली होती.दरम्यान, पावसाळ्यात बंद असलेली गाडी दिवाळी नंतर सुरू होईल अशी माहिती देण्यात आली. पण आजही गाडी धूळ खात उभी आहे. सर्वच राजकीय पक्षांचे त्याकडे पुरते दुर्लक्ष झाले आहे. दिवाळीनंतर ही गाडी सुरू करण्याचे आदेश महापौर राजेंद्र देवळेकर यांनी अधिकाºयांना दिले होते. परंतु, ते देखील ठोस कृती अभावी कागदोपत्रीच राहिले आहेत.लवकरच धावणार गाडीकेडीएमसी परिसरातील उद्याने देखभाल दुरुस्तीसाठी विविध संस्थानांना देण्याचा ठराव मंजूर केला गेला आहे. संबंधित उद्यान गणेश मंदिर संस्थानाकडे देण्यात आले आहे.मोराची गाडी सुरू करण्याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याने येत्या महिनाभरात ही गाडी लहान मुलांसाठी उपलब्ध होईल, असा दावा भाजपाचे नगरसेवक संदीप पुराणिक यांनी केला आहे.कुचकामी प्रशासनआम्ही सातत्याने पाठपुरावा केला आहे. पण निर्लज्ज सत्ताधारी आणि कुचकामी प्रशासन यामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. नव्या स्वरूपातील मोराची गाडी सुरू होताना भाजपाचे राज्यमंत्री, नगरसेवक श्रेयासाठी धावले, उद्घाटनाचे फलकही झळकविण्यात आले. पण कित्येक महिने ही गाडी बंद आहे. साधी एक मोराची गाडी चालवू शकत नाही आणि बुलेट ट्रेन चालविण्याच्या वार्ता केल्या जातात, असा टोला मनसेचे शहर अध्यक्ष मनोज घरत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सत्ताधाºयांना लगावला. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याण