शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

वसईतील सर्वच मार्गावर बसेस चालवू

By admin | Updated: June 23, 2017 05:08 IST

सध्या सुुरु असलेल्या रुटसह सर्वच रुटवर बस सेवा चालवू असे प्रतिज्ञापत्र मुंबई हायकोर्टात सादर करून एसटी महामंडळाने

शशी करपे लोकमत न्यूज नेटवर्कवसई : सध्या सुुरु असलेल्या रुटसह सर्वच रुटवर बस सेवा चालवू असे प्रतिज्ञापत्र मुंबई हायकोर्टात सादर करून एसटी महामंडळाने एक तर सर्वच मार्गावर बस सेवा सुरु करा अन्यथा सगळेच मार्ग आम्हाला द्या, असेच वसई विरार महापालिकेच्या परिवहन विभागाला अप्रत्यक्षरित्या सुनावले. त्यामुळे फक्त फायद्याचेच रुट मागणाऱ्या परिवहन विभागाची कोंडी झाली आहे.एसटी महामंडळाने राज्य सरकारच्या निर्णयानुसार शहरी मार्गावरील बससेवा बंद करून महापालिकेच्या परिवहन सेवेला दिल्या आहेत. मात्र, परिवहन विभागाने फायद्याचे मार्गावरच बससेवा सुरु करून वसई आणि नालासोपारा डेपोतून ग्रामीण भागात सुटणाऱ्या रुटवर बस सेवा सुरु करण्यास टाळाटाळ सुरु केली आहे. गाड्या उभ्या करण्यासाठी आणि प्रवाशांना उभे राहण्यासाठी जागा नसल्याने वसई आणि नालासोपारा डेपोतून उर्वरित २१ रुटवर बससेवा सुरु करण्यास असमर्थ असल्याचे कारण पुढे करीत महापालिकेने जवळपास दहा महिन्यांपासून बस सेवा सुरु करण्याचे टाळले आहे. एसटी महामंडळाने तीनवेळा या रुटवरील बससेवा बंद केल्या होत्या. त्यामुळे आंदोलनही झाले होते. शेवटी डॉमणिका डाबरे आणि एक विद्यार्थी शयरन डाबरे यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. मुंबई हायकोर्टाने अंतिम निर्णय होईपर्यंत बससेवा सुरु ठेवण्याचेआदेश एसटीला दिले आहेत. दरम्यान, परिवहन विभाग जागेसाठी अडून बसले आहे. तर एसटी महामंडळ जागा न देण्यावर ठाम आहे. त्यामुळे हा वाद मिटत नसल्याने परिवहन विभाग बससेवा सुरु करीत नाही. आता २२ जून २०१७ रोजी हायकोर्टात याप्रकरणी सुनावणी झाली महामंडळाने आपल्या प्रतिज्ञापत्रात सध्या फायद्यात असलेले वसई-ठाणे-मुलुंड, वसई-नवघर, नवघर पूर्व-सातीवली, नवघर पूर्व-वसई-हायवे फाटा, अर्नाळा-विरार, अर्नाळा-विरार-हायवे आणि नालासोपारा-हायवे फाटा या रुटवर बस चालवण्यास तयार असल्याचेही नमूद केले आहे. या रूटवर सध्या परिवहनच्या बसेस धावत आहेत.