शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात बॉम्बच्या अफवेने रेल्वे स्थानक परिसरात घबराट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 22:18 IST

ऐन गर्दीच्या ठिकाणी ठाणे रेल्वे स्थानक परिसरात एका बॅगेत बॉम्ब असल्याच्या वृत्ताने बुधवारी दुपारी एकच खळबळ उडाली. पोलीस बॅगेची खातरजमा करेपर्यंत अनेकांची भीतीने गाळण उडाली होती.

ठळक मुद्देनौपाडयाच्या दादा पाटीलवाडीतील घटनाबॉम्ब नसल्याचा टायगरने केला इशाराप्रवाशाची बॅग विसरल्याने उडाला गोंधळ

ठाणे : ठाणे रेल्वेस्थानक परिसरातील ऐन गर्दीच्या ठिकाणी एक बेवारस बॅग सापडली. त्यात बॉम्ब असल्याच्या शक्यतेमुळे बुधवारी दुपारी एकच खळबळ उडाली. पोलिसांच्या बॉम्बशोधकनाशक पथकातील श्वान ‘टायगर’ने यात ‘तसे’ काहीही नसल्याचा इशारा दिल्यानंतर पोलिसांसह नागरिकांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला.नौपाड्यातील दादा पाटीलवाडी परिसरातील कोटक महिंद्रा बँकेसमोर एक बेवारस बॅग असून त्यात बॉम्ब असल्याची माहिती दुपारी १.१५ वाजण्याच्या सुमारास नौपाडा पोलिसांना मिळाली. ही माहिती ठाणे शहर पोलीस नियंत्रण कक्षाकडेही देण्यात आली. नौपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, स्थानिक नगरसेवक संजय वाघुले यांनीही त्याठिकाणी भेट देऊन गर्दीवर नियंत्रण आणले. त्यानंतर, बॉम्बशोधकनाशक पथकाचे (बीडीडीएस) वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए.एम. खुल्लम, सहायक पोलीस निरीक्षक व्ही.आर. तांबोळी, हवालदार (डॉग हॅण्डलर) सचिन पाटील यांनी श्वान ‘टायगर’च्या मदतीने या बॅगेची तपासणी केली. मात्र, या बॅगेत तसे काहीच नसल्याचा निर्वाळा टायगरने अवघ्या काही मिनिटांतच दिला. त्यानंतर, ‘बीडीडीएस’च्या पथकाने ही बॅग नौपाडा पोलिसांच्या हवाली केली. बॅगेत केवळ कपडे आणि काही वैद्यकीय कागदपत्रे मिळाली. त्या कागदपत्रांच्या आधारे ती ठाण्याच्या महात्मा फुलेनगर येथे राहणाऱ्या सी.एच. प्रसादराव यांची असल्याचे उघड झाले. त्याचआधारे त्यांना पोलिसांनी संपर्कही केला. आंध्र प्रदेशात आपल्या गावी गेलेले प्रसादराव बुधवारी सकाळी ठाण्यात परतले. त्यांच्याकडे सहा बॅगा होत्या. ठाण्याच्या सॅटीस पुलावरून उतरल्यानंतर धावपळीत त्यांची एक बॅग मात्र रिक्षास्टॅण्डजवळच विसरली. थेट घरी पोहोचल्यानंतर त्यांना बॅग विसरल्याचे लक्षात आले. तोपर्यंत नौपाडा पोलिसांचाही त्यांना फोन आला. बॅगेत कोणताही बॉम्ब नसल्याचा निर्वाळा झाल्यानंतर पोलिसांसह नागरिकांनी तर बॅग मिळाल्यानंतर प्रसादराव यांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिस