शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधारी शिवसेनेत बेबनाव?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 00:27 IST

महिला-बालकल्याण समितीच्या सभापतीपदी मंगळवारी शिवसेनेच्या दीपाली पाटील बिनविरोध निवडून आल्या असल्या, तरी...

कल्याण : केडीएमसीच्या महिला-बालकल्याण समितीच्या सभापतीपदी मंगळवारी शिवसेनेच्या दीपाली पाटील बिनविरोध निवडून आल्या असल्या, तरी डोंबिवलीला हे पद गेल्याने समितीच्या कल्याणमधील शिवसेनेच्या सदस्या नाराज झाल्या आहेत. दरम्यान, कोणतीही नाराजी नसल्याचा दावा पक्षाचे महापालिका गटनेते रमेश जाधव यांनी केला आहे.महिला व बालकल्याण समितीत ११ सदस्या आहेत. यात शिवसेनेच्या पाच, भाजपाच्या चार आणि काँग्रेस, मनसेचा प्रत्येकी एक सदस्या आहेत. महिला-बालकल्याण समितीच्या सभापतीपदाची निवडणूक मंगळवारी झाली. या वेळी उमेदवारी देताना पक्षातील अन्य इच्छुकांना विश्वासात घेतले नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे काही सदस्या नाराज आहेत. काहींनी निवडणुकीला न जाणे पसंत केले. विशेष म्हणजे समितीमधील शिवसेनेच्या पाचपैकी चार सदस्या या कल्याणच्या आहेत. स्थायीचे गत सभापतीपद डोंबिवलीकडे गेले होते. त्यामुळे ‘महिला-बालकल्याण’चे सभापतीपद कल्याणला मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, डोंबिवलीच्या दीपाली पाटील यांना उमेदवारी दिली गेल्याने इच्छुक सदस्यांचा अपेक्षाभंग झाला आहे.आगामी महापौरपद भाजपाकडे जाणार आहे, परंतु त्यानंतर हे पद पुन्हा शिवसेनेकडे येणार आहे. त्या वेळी लोकसभेच्या निवडणुकांचा काळ पाहता त्या पदावर डोंबिवलीकरांचीच वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. डोंबिवलीलाच मानाची पदे मिळत असल्याची चर्चा कल्याणकरांकडून दबक्या आवाजात सुरू आहे. महिला बालकल्याण समिती सभापतीपदाच्या निवडणुकीतही डोंबिवलीतील एका गटाचे वर्चस्व राहिल्याचे बोलले जात आहे. समितीतील काही महिला सदस्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’कडे नाराजी व्यक्त केली.याप्रकरणी गटनेते जाधव म्हणाले, समितीच्या सदस्यांमध्ये कोणतीही नाराजी नाही. पाटील यांची निवड बिनविरोध झाली आहे. त्यामुळे नाराजीचा प्रश्नच नाही. जे नाराज असतील, त्यांची नाराजी दूर केली जाईल, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाkdmcकल्याण डोंबिवली महापालिका