शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भार्इंदरमध्ये आरटीओचे शिबिर कार्यालय पाच दिवस राहणार

By जितेंद्र कालेकर | Updated: December 3, 2020 17:20 IST

आठवडयातून पाच दिवस मीरा भार्इंदर येथे आरटीओचे शिबिर कार्यालय सुरु केले जावे, अशी स्थानिक रहिवाशांची गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होती. याच मागणीच्या पार्श्वभूमीवर यापुढे मीरा भार्इंदर याठिकाणी पाच दिवस आरटीओचे शिबिर कार्यालय सुरु ठेवण्यात येणार असल्याची माहिती ठाणे विभागाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र गायकवाड यांनी दिली.

ठळक मुद्दे ठाण्यापर्यंत अनुज्ञप्तीसाठी येण्याचा त्रास वाचणारवाहन चालकांची होणार सोय

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मीरा भार्इंदर महापालिका क्षेत्रात ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे केवळ तीन दिवसांचे शिबिर कार्यालय सुरु ठेवण्यात आले होते. ते यापुढे आठवडयातून पाच दिवस सुरु राहणार असल्याची माहिती ठाणे विभागाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र गायकवाड यांनी दिली.तब्बल २० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या मीरा भार्इंदर येथील नागरिकांना वाहन परवाना किंवा शिकाऊ अनुज्ञप्ती (लायसन्स) तसेच पक्के अनुज्ञप्ती काढण्यासाठी थेट ठाणे गाठावे लागत होते. घोडबंदर रोडने ठाण्यात येतांना या वाहन धारकांना मोठया वाहतूक कोंडीचा सामनाही करावा लागत असल्यामुळे अनेकांचा यात मोठा वेळ खर्ची होत होता. त्यामुळेच आठवडयातून पाच दिवस मीरा भार्इंदर येथे आरटीओचे शिबिर कार्यालय सुरु केले जावे, अशी स्थानिक रहिवाशांची गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होती. याच मागणीचा पाठपुरावा ओवळा माजीवडा येथील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही राज्य शासनाकडे तसेच ठाण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी गायकवाड यांच्याकडे केली होती. याच मागणीची दखल घेऊन आता आठवडयातील पाच दिवस आरटीओचे हे शिबिर कार्यालय मीरा भार्इंदर येथे १ डिसेंबरपासून सुरु करण्यात आले आहे. हे कार्यालय घोडबंदर रोडवरील घोडबंदर व्हिलेज, मीरा भार्इंदर बस डेपो, मीरा रोड पूर्व याठिकाणी सुरु राहणार आहे. या शिबिर कार्यालयामुळे मीरा भार्इंदर भागातून केवळ अनुज्ञप्ती काढण्यासाठी ठाण्याकडे येणाऱ्या वाहन धारकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. शिवाय, अनुज्ञप्तीचा कोटाही वाढविण्यात आल्यामुळे शिकाऊ अनुज्ञप्ती घेणाऱ्यांनाही चाचणी देण्याची वेळ लवकर दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेRto officeआरटीओ ऑफीस