लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : भिवंडीत यापुढे दोन ऐवजी तीन दिवस प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे शिबिर कार्यालय हे सुरु राहणार आहे. त्यामुळे भिवंडीतील वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.भिवंडीत आठवडयातील केवळ दोन दिवस आरटीओचे शिबिर कार्यालय सुरु ठेवण्यात आले होते. अवघे दोन दिवस सुरु राहणाऱ्या या कार्यालयाची वेळ साधतांना भिवंडीकरांची मोठी दमछाक होत होती. त्यामुळे लोकाग्रहास्तवामुळे स्थानिक आमदार रईस शेख यांनीही आरटीओचे हे शिबिर कार्यालय आठवडयातून तीन दिवस सुरु ठेवण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली होती. या मागणीची दखल घेत ठाणे विभागाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र गायकवाड यांनी २ डिसेंबरपासून हे शिबिर कार्यालय आता आठवडयातून गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असे तीन दिवस सुरु ठेवण्याचे आदेश संबंधितांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली...............................................
भिवंडीत आता तीन दिवस आरटीओचे शिबिर कार्यालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 17:39 IST
भिवंडीत यापुढे दोन ऐवजी तीन दिवस प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे शिबिर कार्यालय हे सुरु राहणार आहे. स्थानिक आमदार रईस शेख यांनीही आरटीओचे हे शिबिर कार्यालय आठवडयातून तीन दिवस सुरु ठेवण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली होती.
भिवंडीत आता तीन दिवस आरटीओचे शिबिर कार्यालय
ठळक मुद्देभिवंडीतील वाहन चालकांना मोठा दिलासास्थानिक आमदार रईस शेख यांच्यासह नागरिकांनी केली होती मागणी