शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे, पालघरमध्ये एकाच दिवसात ५३७ बसेसवर आरटीओची कारवाई: ३० वाहने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 20:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : राज्यभर चालणाºया अवैध प्रवासी वाहतूकीविरुद्ध राज्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांच्या आदेशानुसार ठाणे आणि ...

ठळक मुद्दे परिवहन विभागाचे आदेश प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांसह २५ अधिकारी रस्त्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : राज्यभर चालणाºया अवैध प्रवासी वाहतूकीविरुद्ध राज्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांच्या आदेशानुसार ठाणे आणि पालघर जिल्हयात प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र गायकवाड यांच्यासह २५ अधिकाऱ्यांच्या चमूने ५३७ वाहनांवर कारवाई केली. तर ३० बसेस जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.राज्यात ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ ते ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान एकाच वेळी ही मोहीम राबविण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी राज्यभरातील परिवहन अधिकाºयांना दिले होते. त्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हयातील पडघा, घोडबंदर रोड, कळवा - खारेगाव नाका आणि पालघर चेक पोस्ट तसेच नवी मुंबई आणि कल्याण या ठिकाणी ही तपासणी करण्यात आली. यावेळी स्वत: ठाणे विभागाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी गायकवाड यांच्यासह मुख्यालयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वंभर शिंदे, अंमलबजावणी विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील सर्व सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, वाहन निरीक्षक आणि सहायक मोटर वाहन निरीक्षक अशा अधिकाºयांच्या चमूने ही कारवाई ठिकठिकाणी केली. यामध्ये विनापरवाना अथवा परवान्याच्या अटींचा भंग करुन वाहन चालविणे, टप्पा वाहतूक करणे, प्रवासी बसमधून अवैधरित्या माल वाहतूक करणे, योग्यता प्रमाणपत्र नसणे, वाहनामध्ये बेकायदेशीरपणे फेरबदल करणे, क्षमतेपेक्षा जादा प्रवासी वाहतूक आणि मोटार वाहन कर बुडविणे आदी बाबींची पडताळणी करण्यात आली. ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या तीन हात नाका येथे मोठया प्रमाणात अशा प्रकारे अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणाºया बसेस पकडण्यात आल्या. काही दिवसांपूर्वी आरटीओने अशाच प्रकारे ओव्हरलोड वाहतूक तसेच अवैध प्रवासी वाहतूकीवर कारवाई केली होती. कारवाया थंडावल्यानंतर पुन्हा अवैध वाहतूक सुरु झाली. त्यामुळे राज्यभर अशा प्रकारे पुन्हा कारवाईचे आदेश परिवहन कार्यालयाने दिले होते. या कारवाईमध्ये अवघ्या १२ तासांमध्ये पडघा येथे ७५ बसेसवर कारवाई झाली. दोन बसेस जप्त करण्यात आल्या. त्यापाठोपाठ तीन हात नाका येथे ८० बसेसवर कारवाई करुन दोन बसेसवर जप्तीची कारवाई झाली. घोडबंदर रोड येथे ३७ कारवाया झाल्या. त्यातील चार वाहने जप्त झाली. कळवा येथे ५९ वाहनांवर कारवाई झाली. तर पालघर येथील गुजरात सीमेवरील चेक पोस्ट येथे सर्वाधिक १३० बसेसवर कारवाई झाली. नवी मुंबईत ५५ बसेसवर कारवाई झाली असून १५ बसेस जप्त करण्यात आल्या. तर कल्याणमध्ये ६० बसेसवर कारवाई झाली. यामध्ये एक बस जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.‘‘ गेल्या काही दिवसांपासून अवैध प्रवासी वाहतूककीबाबतच्या तक्रारी आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर परिवहन कार्यालयातून आलेल्या आदेशानुसार ठाणे आणि पालघरमध्ये ही तपासणी मोहीम राबविण्यात आली. यात ५३७ वाहनांवर कारवाई करण्यात आली. तर ३० वाहने जप्त करण्यात आली.’’रवींद्र गायकवाड, प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाण्णे

टॅग्स :thaneठाणेRto officeआरटीओ ऑफीस