शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

उच्च शिक्षिताला घातला ४९ लाखांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 04:48 IST

ऑनलाईनच्या माध्यमातून उच्च शिक्षिताला सुमारे ४९ लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना सोमवारी डोंबिवलीत उघडकीस आली.

डोंबिवली : ऑनलाईनच्या माध्यमातून उच्च शिक्षिताला सुमारे ४९ लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना सोमवारी डोंबिवलीत उघडकीस आली. महागडे मोबाइल आणि टीव्ही घेण्यासाठी त्यांनी चक्क आपल्या मित्रांकडून उसने पैसे घेतले, बँकांकडून कर्ज काढले. त्यानंतर याप्रकरणी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सेल्स मॅॅनेजर ए. आर. कनिश, सेल्स मॅनेजर मोहम्मद इब्राहिम युसुफ, क्लेअरिंग एजंट अरुण जोश, डिलिवरी मॅन अ‍ॅलेक्स आणि फिलीप या पाच जणांविरोधात त्यांनी रामनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.ठाकुर्ली परिसरातील राहणारे भारत कुमार (नावात बदल) हे मुंबईतील एका कंपनीत कॉम्प्युटर सॉफ्टवेअर प्रोफेशनल म्हणून कामाला आहेत. आॅगस्ट २०१७ मध्ये एका सोशल साईटच्या माध्यमातून भारत कुमार यांची ए. आर. कनिश नावाच्या व्यक्तीसोबत ओळख झाली. याच ओळखीतून कनिशने महागडे मोबाइल आकर्षक किमतीत देण्याचे प्रलोभन भारत कुमार यांना दाखवले. नंतर, संबंधित मोबाइल कंपन्यांची माहिती म्हणून कंपनीचा मालक (सेल्स मॅनेजर) मोहमद युसुफ याचे कंपनीचे ओळखपत्र पाठवून आॅर्डर फॉर्म मेल केला. त्याप्रमाणे भारत कुमार यांनी एक टीव्ही, एक आयपॅड आणि दोन महागड्या मोबाइलची बुकिंग केली. यासाठी आगाऊ रक्कम म्हणून २० हजार रुपये बँक खात्यात जमा करण्यासदेखील सांगितले. त्यानंतर आॅगस्ट २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत कुमार यांनी ४८ लाख ९० हजार रुपये ट्रान्सफर केल्यानंतर ठगाने त्याचे मोबाइल नंबर बंद केले. याप्रकरणी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कुमार यांनी रामनगर पोलिसांत सोमवारी तक्रार दाखल केली.