शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीचे १७ कोटी रूपये जमा

By सुरेश लोखंडे | Updated: March 3, 2020 20:15 IST

सुरेश लोखंडे लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी जिल्हातील सहा हजार ९७ शेतकऱ्यांचे ...

ठळक मुद्देसुमारे १६ हजार १४० शेतकऱ्यांच्या बँक खाते१२ हजार ९४१ आतापर्यंत आधार प्रमाणिकरणआतापर्यंत ५० टक्के म्हणजे सहा हजार ९७ शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण

सुरेश लोखंडेलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी जिल्हातील सहा हजार ९७ शेतकऱ्यांचे यशस्वीरित्या आधार प्रमाणिकर झाले आहे. त्यांच्यातील बहुतांशी शेतकऱ्यांची कर्जमाफीची रक्कम बँक खात्यात जमा करण्याचे काम सुरू आहे. मंगळवार संध्याकाळपर्यंत सुमारे १७ कोटी ४६ लाख ९२ हजार रूपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाल्याचे ठाणेजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले.      जिल्ह्यातील या कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची ठाणे जिल्हामध्यवर्ती सहकारी बँकेत १५ हजार ८०१ शेतकऱ्यांचे खाते आहे. तर इतर बँकांमध्ये ३३९ शेतकऱ्यांचे खाते आहे. या सुमारे १६ हजार १४० शेतकऱ्यांच्या बँक खात्यापैकी १२ हजार ९४१ आतापर्यंत आधार प्रमाणिकरण प्रसिध्दसाठी गाव, संस्था निहाय प्राप्त यादीमध्ये १२ हजार ९४१ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण झाले आहे. या आधार प्रमाणिकरणाच्या यादीत गावनिहाय शेतकऱ्यांचा समावेश आहे. यापैकी आतापर्यंत ५० टक्के म्हणजे सहा हजार ९७ शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण झाले आहेत. उर्वरित सुमारे सहा हजार ८४४ शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण शिल्लक आहे.

      या प्रमाणिकरण झालेल्या शेतकऱ्यांचे दोन हजार ८२६ बँक खाते आहेत. त्यात बहुतांशी शेतकऱ्यांचे १७ कोटी ४६ लाख ९२ हजार रूपयांच्या कर्जमाफीची रक्कम जमा झाले. या कर्जमाफीच्या दृष्टीने जिल्ह्यात सुरळीत कामकाज सुरू असल्याचही जिल्हाधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या दृष्टीने युध्दपातळीवर जिल्ह्यात काम सुरू आहे. त्यांच्याही बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे. या कर्जमाफीच्या रकमे संबंधी काही तक्रार असल्याच ती त्वरीत जिल्हास्तरीय समन्वय समितीकडे वर्ग होत आहे. त्यावर त्वरीत निर्णय घेतला जात आहे. तर अंगठ्याचा ठसा उमटत नसलेल्या तक्रारी स्थानिक तहसीलदारांकडे जात असून त्यावर देखील त्वरीत निर्णय घेण्यात येत आहे.

 

टॅग्स :thaneठाणेcollectorजिल्हाधिकारी