शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

३९ कोटींचा खर्च : माणकोली पुलाला अखेर मुहूर्त सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 02:49 IST

३९ कोटींचा खर्च : दोन वर्षांपासून रखडले होते काम

ठाणे : माणकोली उड्डाणपुलाच्या उर्वरित कामासाठी एमएमआरडीएला अखेर मुहूर्त सापडला आहे. गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या कामासाठी एमएमआरडीए आता ३९ कोटी १८ लाख ४८ हजार ५२३ कोटी रुपये खर्च करणार आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी त्यास सुरुवात करण्याच्या प्रयत्नात एमएमआरडीए आहे. हे काम सुरू झाल्यास मुंबई-नाशिकसह भिवंडी-कल्याण-डोंबिवली असा प्रवास करणाऱ्या वाहनचालकांची दररोजच्या वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सप्टेंबर २०१६ मध्ये याचे भूमीपूजन केले होते. मात्र, त्यानंतर भूमी संपादनासह इतर अनेक कामांमुळे हा पूल रखडला होता. स्थानिकांच्या मोबदल्यासाठी होणारा विरोध आणि इतर अनेक कारणांमुळे या पुलाचे काम रखडले होते. नंतर, कंत्राटदार मे. सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.कडून हे काम एमएमआरडीएने काढून घेतले होते. तेव्हापासून हे केव्हा पूर्ण होईल, या प्रतीक्षेत स्थानिक लोकप्रतिनिधींसह वाहनचालक होते. काम रखडल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात कोंडी होत होती. विशेषत: कल्याण-भिवंडीकर या कोंडीला पुरते वैतागले आहेत. त्याचे पडसाद एमएमआरडीएच्या बैठकीत अनेकदा उमटले आहेत. मात्र, पुलामुळे बाधित होणाºया डोंबिवली आणि भिवंडी या दोन शहरांतील शेतकºयांना वेगवेगळा मोबदला दिला जात असल्याचा आरोप करून भिवंडीमधील शेतकºयांनी जमिनी देण्यास विरोध केल्याने हा प्रश्न रेंगाळल्याचे कारण एमएमआरडीएकडून दिले जात होते.लोकसभा निवडणुकीपूर्वी घाईरखडलेल्या कामाचा फटका लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत बसू शकतो, ही शक्यता लक्षात घेऊन नव्या कंत्राटदाराच्या शोधासाठी एमएमआरडीएवर सत्ताधाºयांकडून सतत दबाव वाढत होता. अखेर, आता एमएमआरडीएने नव्या कंत्राटदाराच्या शोधासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली असून या कामावर ३९ कोटी १८ लाख ४८ हजार ५२३ रुपये खर्च होणार आहेत.काम सुरू झाल्यास लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत विरोधकांकडून होणारा संभाव्य विरोध आता मावळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.वाहतूककोंडीतून होणार सुटका : माणकोली जंक्शनवरील उड्डाणपुलाचे काम रखडल्याने वाहनचालकांना दररोज वाहतूककोंडीला तोंड द्यावे लागत होते. विशेषत: भिवंडीच्या गोदामपट्ट्यात येणारी नवी मुंबईतील जेएनपीटीतील कंटेनर वाहतूक किंवा या गोदामातून मुंबई, ठाणे, भिवंडी, उल्हासनगर, मीरा-भार्इंदर, कल्याण-डोंबिवली या शहरांत जाणारी अवजड वाहने दररोज या वाहतूककोंडीत अडकत होती. यामुळे वाहतूक पोलिसांची मोठी डोकेदुखी झाली होती. आता एमएमआरडीएने निविदा प्रक्रिया सुरू केल्याने काम सुरू झाल्यास चालकांची दररोजच्या कोंडीतून सुटका होईल. 

टॅग्स :Electionनिवडणूकthaneठाणे