शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाल्यांच्या संरक्षणासाठी रिपाइं रस्त्यात उतरेल - अंकुश गायकवाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2017 15:58 IST

गरीब फेरीवाल्यांवर हल्ला झाला तर भीमसैनिक मनसैनिकांना चोख उत्तर देतील असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिल्यानंतर, डोंबिवलीतील रिपाइंचे कार्यकर्ते सज्ज झाले आहेत.

डोंबिवली -  गरीब फेरीवाल्यांवर हल्ला झाला तर भीमसैनिक मनसैनिकांना चोख उत्तर देतील असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिल्यानंतर, डोंबिवलीतील रिपाइंचे कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. डोंबिवलीतील फेरीवाल्यांच्या संरक्षणासाठी रिपाइंचे कार्यकर्ते रस्त्यात उतरणार असल्याची माहिती रिपाइंचे डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड यांनी दिली.मनसेच्या कार्यकर्त्यांकडून शनिवारी ठाणे, कल्याण आणि डोंबिवली रेल्वे परिसरातील फेरीवाल्यांच्या स्टॉल्सची तोडफोड करून, त्यांच्यावर हल्ला करून आंदोलन छेडले होते. त्यांच पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी मनसेला इशारा दिलाय. फेरीवाल्यांच्या होणाऱ्या त्रासाची तक्रार पोलीस अथवा प्रशासनाकडे करावी. मात्र मनसेने कायदा हातात घेऊ नये. त्यांच्यावर हल्ला केलास भीमसैनिक चोख उत्तर देतील. गोरगरीब फेरीवाल्यांवर दादागिरी करीत त्यांच्यावर हल्ला करण्यापेक्षा मनसैनिकांनी लष्करात जाऊन सीमेवर्ती देशाच्या दुष्मनांशी लढावे असा खोचक सल्ला ही आठवले यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिला होता. आठवले यांनी केलेल्या आवाहनानंतर डोंबिवलीतील रिपाइंचे सर्व कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. डोंबिवलीतील सर्व फेरीवाल्याच्या पाठीशी रिपाइंचे कार्यकर्ते खंबीरपणे उभी राहणार आहे असे अंकुश गायकवाड यांनी सांगितले. फेरीवाले हे एकटे आहेत असे मनसेने समजू नये. यापुढे फेरीवाल्यावर हल्ला कराल तर याद राखा असा इशाराही गायकवाड यांनी दिलाय.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेMumbai Localमुंबई लोकल