शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत अतिक्रमण कारवाई विरोधात आरपीआय सेक्युलरचा तहसीलदार कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा 

By नितीन पंडित | Updated: December 2, 2022 14:57 IST

Bhiwandi News: उच्च न्यायालयातील एका आदेशाने महाराष्ट्रातील गुरचरण जागेवरील अतिक्रमण काढून टाकावे यासाठी आदेश दिल्याने महसूल यंत्रणा कामाला लागली आहे.यामुळे विस्थापित होणाऱ्या गोरगरीब जनते मध्ये कमालीचा संताप आहे

- नितीन पंडितभिवंडी  - उच्च न्यायालयातील एका आदेशाने महाराष्ट्रातील गुरचरण जागेवरील अतिक्रमण काढून टाकावे यासाठी आदेश दिल्याने महसूल यंत्रणा कामाला लागली आहे.यामुळे विस्थापित होणाऱ्या गोरगरीब जनते मध्ये कमालीचा संताप असून आरपीआय सेक्युलरचे प्रदेश सरचिटणीस अँड किरण चन्ने यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार कार्यालयावर शुक्रवारी बिऱ्हाड मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये चंद्रकांत पाटील,गणेश भोईर,रमेश वाळंज ,तुफैले फारुखी ,किशोर हुमणे,अमोल तपासे, प्रदीप गायकवाड,ज्ञानेश्वर भोईर व मोठ्या संख्यने गरीब विस्थापित होणारी जनता बिऱ्हाड घेऊन सहभागी झाली होती.           भिवंडी तालुक्यातील २०६६ अतिक्रमणापैकी तब्बल १०८८ अतिक्रमण ही शेलार ग्रामपंचायत हद्दीतील आहेत.त्यामुळे या गावातील नागरीकांनामध्ये प्रचंड आक्रोश असून तो व्यक्त करीत शासनाने तात्काळ न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून ही कारवाई थांबविण्याची मागणी अँड किरण चन्ने यांनी निवेदनात केली आहे.सरकारी जमीन गुरचरण व गायरान व शेतजमीनीमध्ये बांधण्यात आलेली घरे ही पिढ्यांन पिढ्या पासूनची आहेत.सदरचे बांधकाम हे अधिकृत आहे. तर काहींना शासनाच्या इंदिरा आवास योजने मधुन घर बांधून मिळालेली आहेत.या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था द्वारे पाणी दिवाबत्ती या सुविधा दिल्या जात आहेत.या घरांवर मालमत्ताकर आकारणी केली गेली आहे .सदर रहिवासी वस्त्यांमध्ये अनेक शासकीय योजना राबविण्यात आलेल्या आहेत.वस्तीत शासनाचा लाखो रूपयांचा विकास निधी वापरण्यात आलेला आहे. त्यामुळे त्या वस्त्यामधील बांधकामे तुटणार नाहीत,याची दक्षता शासनाने घेण्याची गरज असताना शासन हजारो कुटुंबियांना उध्वस्त करण्यास निघाले आहे हे चुकीचे असल्याचे नमूद करीत अशी कारवाई करण्यापूर्वी विस्थापित होणाऱ्याचे म्हणणे ऐकून घेतले नाही या बाबत खंत व्यक्त केली आहे.या मोर्चा दरम्यान आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार कार्यालयात नायब तहसीलदार गोरख फडतरे याच्याकडे राज्य शासनाच्या नावे असलेले निवेदन अँड किरण चन्ने यांच्या नेतृत्वा खालील शिष्टमंडळाने सुपूर्द केले .