शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
5
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
6
Operation Sindoor Live Updates: भारताचा कोणताही शत्रू वाचू शकत नाही, अमित शाहांची पोस्ट
7
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
8
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
9
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
11
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
12
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
13
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
14
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
15
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
16
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
17
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
18
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
19
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
20
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?

रिपाइंला ५, शिवसंग्राम १ जागा?

By admin | Updated: January 29, 2017 03:16 IST

ठाण्यात शिवसेना-भाजपाचा काडीमोड होताच आतापर्यंत २० जागांची मागणी करणाऱ्या रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाने (रिपाइं) आणखी १० जागांची मागणी करीत ३० जागा सोडण्याचा

ठाणे : ठाण्यात शिवसेना-भाजपाचा काडीमोड होताच आतापर्यंत २० जागांची मागणी करणाऱ्या रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाने (रिपाइं) आणखी १० जागांची मागणी करीत ३० जागा सोडण्याचा आग्रह धरला आहे. निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेपाठोपाठ रिपाइंची बोलणी फिस्कटली, तर सत्ताधारी भाजपाला मित्रपक्षांना सांभाळता येत नाही, असा संदेश जातो. त्यामुळे रिपाइंने दबावतंत्राचा अवलंब केला आहे. रिपाइंच्या मागणीवर भाजपाचा निर्णय काय होणार, ते येत्या दोन दिवसांत स्पष्ट होणार आहे. मात्र, रिपाइंला ५ तर शिवसंग्रामला १ जागेखेरीज जास्त जागा सोडण्यास भाजपा तयार नाही, असे संकेत प्राप्त झाले आहेत. शिवसेनेबरोबरची युती विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तुटली, तेव्हाच भाजपाने रिपाइं, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रासपा व शिवसंग्राम या युतीच्या मित्रपक्षांना आपल्याकडे खेचले. रिपाइंचे रामदास आठवले सध्या केंद्र सरकारमध्ये मंत्री आहेत. रिपाइंसोबत जागावाटपाची चर्चा सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. रिपाइंला किती आणि कोणत्या जागा दिल्या जाऊ शकतात, याचा अंदाज भाजपा घेत आहे. मात्र, तेवढ्यात रिपाइंने अचानक आपला दावा २० जागांवरून ३० जागांवर वाढवला आहे. भाजपाची लढत शिवसेनेबरोबर असून भाजपाकरिता प्रत्येक जागा महत्त्वाची आहे. रिपाइंला जास्तीतजास्त ४ ते ५ जागा देण्याची भाजपाची तयारी आहे. ‘शिवसंग्राम’ संघटनेने भाजपाकडे १६ जागा मागितल्या आहेत. या पक्षाला केवळ एक किंवा दोन जागा भाजपा देऊ शकते. येत्या मंगळवार, ३१ जानेवारीस माघी गणेशोत्सवास प्रारंभ होत असून उमेदवारांचे अर्ज दाखल करणे सुरू होईल. तत्पूर्वी म्हणजे रविवार-सोमवारी भाजपाचे स्थानिक नेते व रिपाइं, शिवसंग्रामचे नेते यांच्यात जागावाटपाचा फैसला होणे अपेक्षित आहे. समजा, हे पक्ष आपापल्या दाव्यांवर ठाम राहिले, तर त्यांच्याशी वाटाघाटी न करता अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत काही प्रबळ बंडखोरांची बंडखोरी काबूत आणता येईल. किरकोळ बंडखोरीची दखल न घेण्याचे धोरण भाजपा स्वीकारेल, असे समजते. (प्रतिनिधी)भाजपाकडून चर्चेला सुरुवात झाली असून त्यांच्याकडे आम्ही आता २० नाही तर ३० जागा मागितल्या आहेत. चर्चेअंती किती जागा मिळतील, त्यावरच पुढील दिशा ठरवली जाणार आहे.-रामभाऊ तायडे, रिपाइं, ठाणे शहराध्यक्ष, आठवले गट