शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

आरपीएफ जवानाने महिलेला वाचवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 02:59 IST

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या सुमंगला वाघ (५४, रा. शंखेश्वर, रामबाग, कल्याण पश्चिम) यांना जितेंद्रकुमार यादव या रेल्वे पोलीस दलाच्या जवानाने प्रसंगावधान राखून वाचवले.

डोंबिवली : कल्याण रेल्वेस्थानकानजीक रविवारी सकाळी ९.२७ वाजता मुंबई-लखनऊ पुष्पक एक्स्प्रेसखाली आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या सुमंगला वाघ (५४, रा. शंखेश्वर, रामबाग, कल्याण पश्चिम) यांना जितेंद्रकुमार यादव या रेल्वे पोलीस दलाच्या जवानाने प्रसंगावधान राखून वाचवले.या घटनेसंदर्भात यादव यांनी सांगितले की, मी कल्याण रेल्वे यार्डात कामावर जात होतो. त्यावेळी पुष्पक एक्स्प्रेस ज्या ट्रॅकवर येत होती, त्या दिशेने सुमंगला जात होती. त्यावेळी आवाज देऊनही तिने ऐकले नाही. म्हणून, मी इंजीनच्या पायलटलाही सांगितले. प्रसंगावधान राखत त्यांनीही इंजीनचा ब्रेक दाबला. पण, तरीही ती महिला काही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती. ती गाडीखाली जात होती. तेवढ्यात, मी तिला खेचून रुळांमधून बाहेर काढले. त्यामुळे तिचे प्राण वाचले आहेत.महिलेची विचारपूस करून तिला काही दुखापत झाली आहे का, याची तपासणी करण्यासाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात नेण्यात आले. तेथे किरकोळ उपचार करून तिला सुखरूपपणे घरी सोडण्यात आले.यादव यांचे कौतुकयादव यांनी प्रसंगावधान राखत महिलेचे प्राण वाचवल्याने त्यांचे लोहमार्ग पोलीस, आरपीएफ आणि रेल्वेच्या अन्य वर्तुळात कौतुक होत आहे. वरिष्ठ पातळीवरही त्याची नोंद घेतल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :thaneठाणे