शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रोबोटिक ब्लेड फ्री लेझर मोतीबिंदू शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 03:10 IST

ठाण्यातील एका नेत्रालयात राज्यातील पहिली रोबोटिक ब्लेड फ्री लेझरने यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

ठाणे : ठाण्यातील एका नेत्रालयात राज्यातील पहिली रोबोटिक ब्लेड फ्री लेझरने यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. अवघ्या २० सेकंदांत कोणतेही ब्लेड किंवा हत्यार न वापरता लेझरच्या साहाय्याने शस्त्रक्रिया केली जात असून तीन ते चार दिवसांत रुग्ण नेहमीप्रमाणे कामावर रुजू होऊ शकतो. या अत्याधुनिक मशीनची किंमत चार करोड रुपये असल्याची माहिती रुग्णालयाच्या वतीने बुधवारी ठाण्यात झालेल्या एका पत्रकार परिषदेत दिली.डोळे अनमोल असून साधारणत: पन्नाशीनंतर डोळ्यांमध्ये मोतीबिंदूची लक्षणे दिसू लागतात. त्यातच, अस्पष्ट दिसण्यास सुरुवात होते. मोतीबिंदूमध्ये डोळ्यांच्या बुब्बुळावर एक पडदा तयार होतो. बुब्बुळाच्या आतमध्ये मोतीबिंदू पिकू लागतो. सध्या तरी डोळ्यांचे डॉक्टर मोतीबिंदू दोष घालवण्यासाठी शस्त्रक्रिया करतात. मात्र, शस्त्रक्रिया हाताने केली जाते. त्यातच दिल्ली, चेन्नईपाठोपाठात आता ठाण्यात रोबोटिक ब्लेड फ्री लेझरने मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे नवे तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. संगणकाच्या साहाय्याने डोळ्यांचे स्कॅनिंग करून लेझरचा वापर करून मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाते. त्यामुळे रुग्णाला २० सेकंदात मोकळे केले जाते. तर, मानवी मेंदू व हात वापरून मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करायला साधारण १० मिनिटे लागतात. मात्र, यावेळी कितीही काळजी घेतली तरी छोटीशी मानवी चूक माणसाला फार मोठी किंमत मोजायला लावू शकते. मात्र, नवीन रोबोटिक ब्लेड फ्री लेझरने अचूकता १०० टक्के येते. तसेच प्रत्यक्ष शस्त्रक्रियेत कोणताही धोकादेखील नसतो, असा दावा या नेत्रालयाने केला आहे.ही मशीन अमेरिकेतील लेन्सार कंपनीची असून राज्यात या नेत्रालयात पहिल्यांदाच आणण्यात आली आहे. मागील तीन आठवड्यांत २५ जणांवर मशीनद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया क रण्यात आली आहे. ही शस्त्रक्रिया करताना संगणक पेशंटच्या डोळ्यांची मोजणी करून स्कॅनिंग करतो आणि एक प्रकारची थ्रीडी इमेज करून त्याचे संकल्पचित्र डॉक्टरला दाखवतो. डॉक्टरांनी ओके म्हटले की कोणतेही ब्लेड किंवा हत्यार न वापरता लेझरच्या साहाय्याने नेत्रपटलावरील जमा झालेला पडदा काढला जातो. मोतीबिंदूने त्रस्त रुग्णासाठी ही शस्त्रक्रिया एकदा केली की, पुन्हा मोतीबिंदूचा त्रास उद्भवत नाही. ज्यांच्या बुब्बुळात जन्मत: दोष असतो, तोदेखील या शस्त्रक्रियेद्वारे घालवता येतो.

टॅग्स :thaneठाणे