शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

वाढदिवसाच्या पार्टीसाठी ठाण्यात दरोडा; सहा जणांच्या टोळीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 23:56 IST

३६ तासांत गुन्हा उघड, पिस्तूल, काडतुसे आणि वाहन जप्त

ठाणे : वाढदिवसाच्या पार्टीसाठी साथीदारांच्या मदतीने बंदुकीचा धाक दाखवून कारचालकाला लुटणाऱ्या अभिमन्यू पाटील या म्होरक्यासह त्याच्या पाच साथीदारांना ठाणे पोलिसांनी अटक करून पिस्तूल, काडतुसे तसेच वाहन आणि रोख रक्कम असा पाच लाख १५ हजार १०० रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. हा गुन्हा अवघ्या ३६ तासांमध्ये उघडकीस आणल्याची माहिती पोलिसांनी दिली.ठाणे ब्रह्मांड येथील रहिवासी असलेले थॉमस कुट्टी यांचा हॉस्पिटल्सना परिचारिका व वॉर्डबॉय पुरवण्याचा व्यवसाय आहे. त्यांचे कार्यालय विक्रोळीत असून ३ सप्टेंबरला रात्री ११ च्या सुमारास ते कारचालक भाऊसाहेब खिल्लारे यांच्यासह घरी जात होते. याचदरम्यान कापूरबावडी येथे वंडरमॉलनजीक एका कारमधून आलेल्या टोळीने त्यांच्या कारसमोर गाडी आडवी घालून बंदुकीचा धाक दाखवून त्यांना मारहाण करण्यात आली व दोन लाख असलेली पिशवी हिसकावून पलायन केले. याप्रकरणी चालकाच्या तक्रारीवरून चितळसर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. त्यानंतर पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहायक पोलीस आयुक्त पंकज शिरसाठ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड, पोलीस निरीक्षक श्रीकांत धरणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक डी.सी. केदार यांनी या प्रकरणाचा तपास करीत असताना कुट्टी यांचा पूर्वाश्रमीचा चालक अभिमन्यू पाटील (२३, रा. आझादनगर), तौफिक शेख (२१, रा. भीमनगर-वर्तकनगर), गणेश इंदुलकर (२२, रा. वर्तकनगर), उत्कर्ष धुमाळ ऊर्फ लाडू (२१, रा. आनंदनगर, कोपरी), गुरु नाथ चव्हाण (२२, रा. धर्माचापाडा), राहुल गुहेर ऊर्फभाल (२२, रा. चिरागनगर) यांच्या मुसक्या आवळल्या. तर, त्यांचे साथीदार चेतन कांबळे व रोशन तेलंगे हे आरोपी फरार आहेत. कुट्टी यांचा हॉस्पिटल्सना नर्सेस आणि वॉर्डबॉय पुरवण्याचा व्यवसाय असून पगारातल्या कमिशनची १२ टक्के रक्कम महिन्याच्या १, २ आणि ३ तारखेला ही रक्कम त्यांच्याकडे येते, हे अभिमन्यूला माहीत होते.नंबरप्लेट बदलून मित्राच्या गाडीचा वापर : २४ सप्टेंबरला अभिमन्यूचा वाढदिवस असल्याने तो साजरा करण्यासाठी झटपट पैसे मिळवण्यासाठी या टोळीने हा दरोड्याचा कट रचला होता. पाटील आणि गणेश इंदुलकर हे पहिल्यापासूनच गुन्हेगारी प्रवृत्तीचे होते. अभिमन्यू याच्यावर कापूरबावडी पोलीस ठाण्यामध्ये ३०७ चा गुन्हा दाखल आहे, तर गणेश इंदुलकर याच्यावर मुलुंड येथे ३९५ चा गुन्हा दाखल आहे. या दरोड्यासाठी त्यांनी भिवंडी येथील मित्राची गाडी घेऊन तिची नंबरप्लेट काढल्याचेही पोलिसांनी सांगितले.