शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

महाजन सभागृहाच्या कंत्राटदाराकडून लूट सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 00:43 IST

नगरसेविकेला आला अनुभव : पालिका आयुक्तांकडे केली लेखी तक्रार

मीरा रोड : महापालिकेच्या इंद्रलोक येथील प्रमोद महाजन सभागृहाच्या कंत्राटदाराकडून बेकायदा कॅटरिंग, डेकोरेशनसाठी बळजबरी सुरूच असल्याचा अनुभव शिवसेनेच्या नगरसेविका नीलम ढवण यांना आला. त्यांनी कंत्राटदाराची लेखी तक्रार केल्यावर पालिकेने कारवाईचा इशारा दिला. तरीही कंत्राटदाराने कॅटरिंग आपल्याचकडून घेण्यास सांगत पालिकेच्या पत्रास केराची टोपली दाखवली आहे.ढवण यांच्या नातलगाचे लग्न असल्याने त्या स्वत: ८ डिसेंबरसाठी महाजन सभागृहाची नोंदणी करण्यास गेल्या होत्या. त्यांनी करारनाम्याप्रमाणे आपण बाहेरून कॅटरिंग आणि डेकोरेशनची सुविधा घेणार असल्याने प्रती थाळीमागे पालिकेला रॉयल्टी भरू असे कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांना सांगितले. परंतु कंत्राटदार गोल्डन पेटलकडून मात्र त्यांच्याकडील प्रती थाळीच्या विविध वर्गवारी प्रमाणे तक्ता देत बाहेरून कॅटरिंग, डेकोरेशन घेता येणार नाही असे ढवण यांना स्पष्ट केले.

आपण नगरसेविका असल्याचे सांगूनही कंत्राटदाराने त्यांना काडीचीही किंमत न देता कॅटरिंग व डेकोरेशन आमच्याकडूनच घ्यावे लागेल असे स्पष्ट केले. ढवण यांनी या प्रकरणी आयुक्त बालाजी खतगावकर यांच्याकडे लेखी तक्रार केल्या नंतर कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांनी कंत्राटदारास पत्र देऊन कारवाईचा इशारा दिला. पण कंत्राटदाराने बाहेरुन कॅटरिंगची सेवा घेण्यास नकार दिला. परंतु प्रती थाळीच्या दरात काहीशी कपात केली.

नगरसेवकांनाच जर कंत्राटदार बेकायदा कॅटरिंग, डेकोरेशनची सक्ती करत असेल तर सामान्य नागरिकांची तो काय पिळवणूक करत असेल याची कल्पना न केलेली बरी असे ढवण म्हणाल्या. पालिकेने आलिशान बनवलेले सभागृह नागरिकांच्या सुविधासाठी दिले आहे की कंत्राटदाराला सामान्यांची लूट करण्यासाठी याचा खुलासा पालिकेने करावा अशी मागणीही ढवण यांनी केली आहे.

याआधीही कंत्राटदाराविरोधात तक्रारीदोन्ही सभागृह हे बोरिवलीच्या गोल्डन पेटल या एकाच कंत्राटदारास देण्यात आली. महाजन सभागृहाचे भाडे २० हजार तर तळमजल्याचे भाडे १० हजार आहे. ठाकरे सभागृहचे पहिल्या मजल्याचे १५ हजार तर दुसºया मजल्याचे २० हजार भाडे आहे. कॅटरिंग, डेकोरेशनची सुविधा कंत्राटदाराकडून घेणे बंधनकारक नाही. तरीही कंत्राटदार बाहेरून कॅटरिंग सुविधा घेऊ देत नाही आणि स्वत: मात्र प्रती थाळीनुसार मनमानी पॅकेज शुल्क वसूल करत असल्याच्या तक्रारी या आधीही प्रसाद परब, अनिल नोटीयाल आदींनी केल्या आहेत. प्रसाद यांच्या सुनावणीच्यावेळी तर आयुक्तांनी कंत्राट रद्द करा असे निर्देशही दिले होते. परंतु कार्यवाही मात्र अजूनही झाली नाही.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक