शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण, रस्त्यावरून प्रवास करणे होते धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 23:57 IST

जिल्ह्यातील अनेक शहरांतील परिस्थिती : रस्त्यावरून प्रवास करणे होते धोकादायक

नालासोपाऱ्यात रस्त्यांवर खड्डेचखड्डेनालासोपारा : वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील नालासोपारा प्रभागातील रस्त्यांवर खड्डेचखड्डे पडले आहेत. मोठ्या प्रमाणात रस्त्यांची चाळण झालेली दिसते आहे. नालासोपारा पूर्वेकडील काही रस्त्यांवर मोठे मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहतुकीस आणि रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. या खड्ड्यांमुळे काही काळ वाहतूक कोंडी होते. अशा खड्डेमय रस्त्यांना कारणीभूत कोण आहे, वसई विरार महानगरपालिका की कंत्राट घेणारे कंत्राटदार हा सवाल नालासोपाºयातील लोकांना पडला आहे. जे रस्त्याचे ठेके घेतात ते हलक्या प्रतीचे मटेरियल वापरतात. त्यामुळे रस्त्यांची लवकर दुर्दशा होते. रस्ता नवीन बनवल्यानंतर एक वर्षही व्यवस्थित राहत नाही. अनेकदा तर पहिला पाऊस पडला की रस्त्यावर खड्डे पडतात आणि लोकांना त्रास सहन करावा लागतो.

नालासोपारा पूर्वेकडील सेन्ट्रल पार्क, विजय नगर, तुळींज रोड, संतोष भवन, धानिवबाग, वाकणपाडा, पेल्हार तर पश्चिमेकडे स्टेशन रोड, सिविक सेंटर आणि ब्रिजच्या आजूबाजूच्या विभागात जास्त खड्डे पडले होते. संतोष भवन परिसरात १० ते १२ दिवसांपूर्वी खडी आणि बारीक भुसा टाकून खड्डे बुजवण्याचे काम करत रस्त्याना मलम लावण्याचा प्रकार केला पण त्यानंतर पडलेल्या पावसामुळे थुकपट्टी लावलेले वाहून गेले आणि आता परत खड्डे दिसू लागले असून वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.या खड्ड्यांबाबत वारंवार तक्रार करूनही हे खड्डे भरले जात नाहीत. वास्तविक जो कंत्राटदार रस्ता बनवतो त्याचीच खड्डे बुजवायची जबाबदारी असली पाहिजे. पण काही अधिकाऱ्यांचे कंत्राटदार यांच्याशी साटेलोटे व आर्थिक व्यवहार असल्यामुळे त्यांना काहीही बोलत नाही, असा स्थानिकांचा आरोप आहे.नालासोपाºयाच्या पूर्वेकडील संतोष भवन परिसरातील मुख्य रस्ता पीडब्लूडी यांच्या अखत्यारीखाली असून त्यांना ३ ते ४ वेळा पत्रव्यवहार करून खड्डे बुजवण्यास सांगितले आहे. पण ते काही करत नाही. पेल्हार ब्रिजच्या खालील रस्त्याला पडलेले खड्डे हायवे अथोरिटी बुजवेल. पण महानगरपालिकेच्या हद्दीमधील खड्डे लवकरच बुजवणार आहे. पावसाचा जोर कमी झाला की खड्डे बुजवण्याचे निर्देश इंजिनियरला दिलेले आहे.- राजेंद्र लाड, कार्यकारी अभियंता,वसई विरार महानगरपालिकारस्त्यावर खड्डे पडल्याचा जास्त त्रास रिक्षावाल्यांना होतो. खड्ड्यांमुळे कधी अपघात होईल का अशी भीती सतत भेडसावत असते. रिक्षा खड्ड्यामधे आपटून मोठे नुकसान होत असते.- अतुल सिंह,रिक्षा चालकखड्ड्यांमुळे होणाºया कोंडीने चालक त्रस्तलोकमत न्यूज नेटवर्कबोईसर : अहोरात्र प्रचंड वाहतूक होत असलेल्या बोईसर-तारापूर आणि पालघर-बोईसर या मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्याची ठिकठिकाणी अक्षरश: चाळण झाली आहे. रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने रस्त्यावर वाहन चालवणे चालकांसाठी मुश्किल झाले आहे.या मुख्य रस्त्यावरील सिडको (आनंद हॉस्पिटलसमोर), ओसवाल एम्पायरच्या दोन्ही मुख्य प्रवेश द्वारासमोर तसेच व मुख्य व मोठी बाजारपेठ समजल्या जाणाºया चित्रालय बरोबरच बोईसर-पालघर रस्त्यावरील सरावली, पंचाळी उमरोळी इत्यादी ठिकाणच्या रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडले असून काही ठिकाणी डबक्याचे दृश्य पाहावयास मिळते तर या रस्त्यावर केलेल्या डांबराची मलमपट्टी निघून गेल्याने लाखो रुपयाचा खर्च पाण्यात जाऊन नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी करण्यात आल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.खड्ड्यांमुळे नेमका रस्ता कुठे आहे, असा प्रश्न चालकांना पडत आहे. विशेषत: विद्यार्थ्यांना तसेच वृद्ध, गर्भवतींना येथून चालणे धोक्याचे झाले आहे. यापैकी काही रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम काही महिन्यांपूर्वी करण्यात आले होते. मात्र आता पडलेले मोठे खड्डे आणि त्याची अवस्था पाहून या कामाच्या दर्जावरच प्रश्न उपस्थित केला जात आहे.रस्त्याच्या दुरवस्थेमुुळे वाहतूक संथ गतीने होत असून थातूरमातूर डागडुजी केल्यानंतर परिस्थितीत काही फरक पडत नाही. प्रशासन लक्ष देत नसल्याने नागरिक संतप्त आहेत.गुणवत्तेकडे कानाडोळाकिमान दोन, चार, सहा ते दहा फुटांपर्यंत लांबी रु ंदीचे खड्डे पडले असून पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी पक्के नाले नसल्याने पाण्याचा निचरा होत नसून तो रस्त्यावरच साचून राहत आहे. तसेच लाखो रुपयांचा निधी खर्चूनही कामाच्या गुणवत्तेकडे कानाडोळा होत असल्याने रस्त्यांची ही अवस्था झाली आहे.रस्त्यांची दुर्दशा होण्यास कारणीभूत ठरणाºया संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांच्या विरोधात कठोर कारवाईचा बडगा उगारावा.- शंकर जुलपाल, सिटी स्कॅन टेक्निशियन, बोईसरखड्ड्यामुळे दुचाकी चालकांच्या अपघातात वाढ झाली असून मणका व कंबर दुखण्याचे रु ग्ण जास्त येत आहेत.- डॉ. संतोष संगारे, अस्थि रोग तज्ञ आनंद हॉस्पिटल बोईसर

टॅग्स :Vasai Virarवसई विरारnalasopara-acनालासोपारा