शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
Crime News : धक्कादायक! रात्री उशिरा गावात गोळीबारचा आवाज झाला, जमिनीच्या वादातून दोन भावांना गोळ्या घातल्या
3
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 'या' कामासाठी मिळणार ३० दिवस सुट्टी
4
थायलंडमध्ये भारतीय पर्यटकांचे लाजिरवाने कृत्य; मौजमजेसाठी बारगर्ल बोलविली आणि तिच्या शरीरावरच घेतला आक्षेप...
5
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
6
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
7
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
8
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
9
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
10
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
11
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
12
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
13
विघ्नहर्ता, प्रवासाचे विघ्न दूर करशील का? गणपती विशेष गाड्या पहिल्या मिनिटालाच फुल्ल
14
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
15
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
16
‘स्लिपिंग प्रिन्स’ला कधीच जाग येणार नाही! सौदीच्या 'झोपलेल्या राजकुमारा'चा प्रवास थांबला
17
कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?
18
स्विगी-झोमॅटो : ‘गिग’ कामगारांना हवी कायद्याची सुरक्षा
19
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल

उल्हासनगरातील मैदाने व उद्यानात रोडरोमियोचा उच्छाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2021 17:37 IST

Ulhasnagar News :

- सदानंद नाईक उल्हासनगर : कोरोना अनलॉक मध्ये उद्याने व मैदाने नागरिकांसाठी खुली केल्याचा फायदा रोडरोमियो, नशेखोर व भुरटे चोरांनी घेतल्याचे चित्र आहे. त्यांच्या आंतकामुळे मुली, महिला व वृद्ध नागरिक मैदान व उद्यानात जाण्यास धजावत नसून नागरिकांनी अश्यावर वॉच ठेवून कारवाई करण्याची मागणी होत आहे.

 उल्हासनगर महापालिकेने नागरिकांच्या सुखसुविधा साठी मैदाने व उद्यानाच्या नुतनीकरण व दुरुस्तीवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. कोरोना महामारीत नागरिकांच्या सुरक्षेसाठी उद्याने व मैदाने बंद ठेवली होती. मात्र कोरोनाचा संख्या कमी झाल्यावर, शासनाने अनलॉक सुरू करून मर्यादीत वेळे साठी मैदाने व उद्याने नागरिकांसाठी खुली केली. मात्र त्याचा लाभ सर्वसामान्य नागरिक, मुली, महिलांना मिळत नसल्याचे चित्र आहे. गोलमैदान व येथील उद्यान खुनी म्हणून ओळखली जात असून त्याठिकाणी गेल्यावर्षी प्रेमप्रकरणातून महिलांचे खून झाल्याचे प्रकार उघड झाले. तीच परिस्थिती शहर पक्श्चिम मधील दसरा मैदान व इतर उद्यानाची आहे. गेल्याच आठवड्यात कॅम्प नं-५ येथील लाललोई गार्डन प्रवेशद्वार समोर पैशाच्या वादातून मित्रांनी मित्राचा खून केल्याचा प्रकार झाला. शहर पूर्वेतील व्हिटीसी मैदानाचे रुपडे बदलणार असून २० कोटीच्या निधीतून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक व स्टेडियम उभे राहणार आहे. मात्र सद्यस्थिती मैदानाची दुरावस्था झाली असून मैदानाच्या शौचालय परिसरात नशेखोर, भुरटे चोर, रोडरोमियांनी उच्छाद मांडला. मैदानाचे प्रत्येक कोपरे दारूच्या बॉटलेने भरून गेले. कॅम्प नं- ५ येथील लाललोई व नेताजी गार्डनचे कोट्यवधी रुपये खर्च करून दुरुस्ती व नुतनीकरण करण्यात आले. मात्र येथेही रोडरोमियो, नशेखोर व भुरटे चोरांनी हैदोस घातला. नेताजी गार्डन मध्ये नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुली व महिलांना शिवीगाळ झाल्याचा प्रकार होऊन सतर्क नागरिकांनी नशेखोरला चोप दिला. महिला व नागरिकांनी पोलीसांना फोन केल्यावर, सर्वशांत झाल्यावर पोलिस आल्याचा प्रकार झाला.

 मैदाने व उद्यानाला सुरक्षारक्षकाची मागणी

 महापालिकेच्या मैदाने व उद्यानाचा कब्जा काही दिवसांनी रोडरोमियो, नशेखोर व भुरटे चोर घेतात की काय? अशी परिस्थिती झाली. नागरिक, मुली, महिला, वृद्ध आदींच्या सुरक्षेसाठी विशिष्ठ जणांना मैदान व उद्यानात प्रवेश देणे. तसेच्या त्यांच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर