शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चिरव गावातील नदी पडली कोरडी; ग्रामस्थांसह जनावरे तहानलेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 00:42 IST

मुंबई, ठाण्यासह उपनगरांना पाणीपुरवठा करणाºया शहापूर तालुक्यातील अडीचशे गावपाड्यांना पाणीटंचाईचा फटका सहन करावा लागत आहे.

वसंत पानसरे किन्हवली : तापमानात वाढ झाल्याने पाण्याची पातळी घसरली असून, उन्हाच्या झळा जसजशा वाढू लागल्या आहेत, तसतशी शहापूर तालुक्यातील पाणीटंचाई उग्र रूप धारण करत आहे. शहापूर तालुक्यातील अनेक गावे आणि पाडे टंचाईग्रस्त म्हणून घोषित केली आहेत. शहापूर तालुक्यातील प्रतिपंढरी समजल्या जाणाऱ्या चिरव गावामधून बारमाही वाहणारी नदी कोरडी पडल्याने, परिसरातील रहिवाशांसह मुक्या जीवांचीही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती होत आहे.

मुंबई, ठाण्यासह उपनगरांना पाणीपुरवठा करणाºया शहापूर तालुक्यातील अडीचशे गावपाड्यांना पाणीटंचाईचा फटका सहन करावा लागत आहे. अशातच शहापूर तालुक्यातील प्रतिपंढरी समजल्या जाणाºया चिरव येथील नदी कोरडी पडली असून नदीच्या पात्रात पाण्याऐवजी दगडधोंडेच दिसत आहेत. चिरव नदीला १२ महिने पाणी असते. या नदीच्या पाण्यावरच शेती व शेती दुय्यम पीक घेऊन ग्रामस्थ उदरनिर्वाह चालवतात. शेतीसाठी आणि पिण्यासाठी या नदीपात्रातून ग्रामस्थ पाणी वापरतात. परंतु, यावेळी नदीचे पात्र पूर्णपणे कोरडेठाक पडल्याने ग्रामस्थांसह जनावरांचीदेखील परवड होत आहे.

खराडे धरणाचे पाणी न सोडल्याने नदी कोरडी पडली आहे. या नदीवर चांग्याचापाडा, अंबरपाडा, वेहळोली, चिरव, आष्टे, कानवे, चेरवली यासारख्या अनेक गावपाड्यांमधील शेतकरी अवलंबून आहेत.

वर्षभर वाहणारी चिरव नदी कोरडी पडली आहे. शेतकऱ्यांनी नदीलगत लावलेल्या भाजीपाल्याचे नुकसान होत असून पिण्याच्या पाण्याचाही तुटवडा जाणवत आहे. धरणातून लवकरात लवकर नदीमध्ये पाणी सोडण्याची गरज आहे. - संतोष चंदे, शेतकरी

टॅग्स :Waterपाणी