शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण, दुर्गम गांवखेड्यातील उष्णतेचा आलेख चढता; आरोग्याची काळजी घ्या!

By सुरेश लोखंडे | Updated: March 9, 2024 19:50 IST

राज्यातील काही भागात उष्णतेचे प्रमाण वाढत असून उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ठाणे : राज्यातील काही भागात उष्णतेचे प्रमाण वाढत असून उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यादृष्टीने उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासन कार्यरत आहे. उष्माघाताचे सर्वेक्षण IHIP- NPCCHH पोर्टल द्वारे कामकाज करण्यात येत आहे. दैंनदिन माहिती IHIP- NPCCHH पोर्टलवर भरण्यासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रावरील आरोग्य सहाय्यक व डेटा एन्ट्री ऑपरेटर यांना सुचना देण्यात आल्या आहेत.

उष्णतेच्या वाढत्या त्रासामुळे ग्रामस्थांनी काळजी घ्यावी. शरीराचे तापमान वाढलेले, बेशुद्ध, गोंधळलेली, घाम येणे थांबलेली अशी व्यक्ती आपल्या नजरेत आल्यास त्वरित १०२/१०८ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी केले आहेत.‌ 

उन्हापासून बचावासाठी काय काळजी घ्याल?१. पुरेसे पाणी प्या, ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी असे द्रव्य पदार्थ घ्या.२. शक्यतो तीव्र उन्हात दुपारी 12 ते 4 या वेळात घरात राहावे.३. सैलसर व सुती कपडे वापर करणे, शक्यतो पांढरे कपडे वापरावेत.  ४. डोक्यावर टोपी रुमाल किंवा छत्री वापरावी.५. थेट येणाऱ्या सूर्यप्रकाशाला उन्हाला अडवावे व वातावरण थंड राहिल यासाठी पंख्याचा वापर करण्यात यावा. ६. गर्भवती स्त्रिया, वैद्यकीय समस्या असणाऱ्या कामगारांनी उन्हात काम करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.७. शेतकरी बांधवानी दुपारी शेतातील काम न करता, सकाळी लवकर शेत कामास सुरुवात करावी. उन्हात शारीरिक कष्टाची कठोर कामे टाळावी.

उष्णतेचा त्रास झालेल्या व्यक्तीची मदत करत असताना या गोष्टींचा अवलंब करावा१. संबंधित व्यक्तीला थंड ठिकाणी किंवा सावलीमध्ये तातडीने हलवावे. २. शरीराच्या जास्तीत जास्त भागावर किंवा कपड्यांवर थंड पाण्याचा मारा करावा. ३. शक्य असेल तेवढा वेळ त्या व्यक्तीला वारा घालावा.  

खालील लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा

प्रौढ व्यक्ती - शरीराचे तापमान 104 फेरहाईट पर्यंत किंवा 40 डिग्री सेल्सिअस पोचल्यास तीव्र डोकेदुखी, स्नायूचे आखडणे, मळमळणे, उलटीचा भास होणे, चिंता वाटणे, चक्कर येणे, हृदयाचे ठोके वाढणे, धडधडणे,लहान मुल - आहार घेण्यास नकार, चिडचिड होणे, लघवीचे कमी झालेले प्रमाण, शुष्क डोळे, कुठूनही रक्तस्त्राव होणे, तोंडाच्या जवळील त्वचा कोरडी होणे अशी लक्षणे दिसून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

टॅग्स :Temperatureतापमानthaneठाणे