शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
2
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
3
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
4
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणार कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
5
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
6
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
7
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
8
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
9
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
10
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
11
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
12
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
13
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
14
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
15
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव
16
लेखी परीक्षा होणार कडेकोट बंदोबस्तात, गैरप्रकार टाळण्यासाठी नवी मुंबई पालिकेचे पोलिस खात्याला पत्र
17
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
18
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
19
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
20
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली

भरधाव ट्रकची सहा रिक्षांना धडक

By admin | Updated: June 24, 2016 03:40 IST

रिक्षा स्टँडमध्ये भरधाव ट्रक घुसल्याने पाच रिक्षा आणि एका तीनचाकी टेम्पोचे नुकसान झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास विठ्ठलवाडी स्थानकाजवळ घडली

कल्याण : रिक्षा स्टँडमध्ये भरधाव ट्रक घुसल्याने पाच रिक्षा आणि एका तीनचाकी टेम्पोचे नुकसान झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास विठ्ठलवाडी स्थानकाजवळ घडली. त्यात पाच जण किरकोळ जखमी झाले. कोळसेवाडी पोलिसांनी बेजबाबदार ट्रकचालकाला अटक केली आहे.रिक्षाचालक मनोज पावशे (४२) रिक्षास्टँडवर दोन प्रवासी घेत होते. इतक्यात उल्हासनगरहून कल्याणच्या दिशेने येणाऱ्या ट्रकचालकाचा ट्रकवरील ताबा सुटला. त्यामुळे तो रिक्षा स्टँडमध्ये घुसला. त्यामुळे पावशे यांच्या डोक्याला दुखापत झाली. तर रिक्षातील दोन प्रवाशांसह आणखी दोघे जखमी झाले. एक जण गंभीर जखमी झाल्याने त्याला मुंबईतील सायन रु ग्णालयात तर इतर चौघांना कल्याणच्या मेट्रो रु ग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर गुरु वारी दुपारी त्यांना घरी सोडल्याचे कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणजी घेटे यांनी सांगितले. या अपघातात पाच रिक्षा व एका टेम्पोचे नुकसान झाल्याचेही ते म्हणाले. ट्रकचालकाचा ताबा सुटल्याने हा अपघाता झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, ट्रकचालकाने मद्यपान केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.अपघातानंतर ट्रकचालक गीते (४०) घटनास्थळाहून पळून गेला. मात्र, नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले. ट्रकचा ब्रेकफेल झाल्यामुळे हा अपघात घडल्याचा दावा त्याने पोलिसांकडे केला. दरम्यान, पावशे याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गीतेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.याविषयी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात संपर्क साधला असता जखमींची व ट्रकचालकाचे नाव देण्यास पोलीस हवालदार साबळे यांनी टाळले. याप्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.