शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

वसईतील रिक्षा चोरट्यांना भिवंडी गुन्हे शाखेने केली अटक; सहा रिक्षा, एक दुचाकी केली जप्त

By नितीन पंडित | Updated: April 28, 2023 17:54 IST

शहरात दुचाकी व रिक्षा चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच भिवंडी गुन्हे शाखा युनिट दोन कडून दुचाकी व रिक्षा चोरी करणाऱ्या दोघा अट्टल चोरट्यांना गुरुवारी अटक करण्यात आली आहे.

भिवंडी : शहरात दुचाकी व रिक्षा चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच भिवंडी गुन्हे शाखा युनिट दोन कडून दुचाकी व रिक्षा चोरी करणाऱ्या दोघा अट्टल चोरट्यांना गुरुवारी अटक करण्यात आली आहे. भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटरसायकल चोरी करणारे दोन संशयित वंजारपट्टी नाका येथे येणार असल्याची माहिती भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांना मिळाली असता त्यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि धनराज केदार, पोउप निरी शिंगे,पोलीस उप निरीक्षक चव्हाण, वाघमारे,सपोउपनिरी चौधरी,रामचंद जाधव,तडवी,पोलिस हवालदार साबीर शेख,  शिर्के,थोरात,शिंदे,पाटील,पाटील, यादव, पोलिस नाईक साळवी,जाधव,डोंगरे,खताळ,पोलिस शिपाई साळुंखे,सोनावणे, बर्वे, जाधव, इंगले, घरत,साळुंखे या पथकाने  सापळा रचून श्रीकांत बाळू बागरवार वय २७, रा.गोरसई व निशांत मंगेश हूकमाळी वय २३ रा. धोंडावडवली या दोघांना ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्यांच्या ताब्यातून चोरी केलेल्या सहा रिक्षा व एक मोटरसायकल अशी ३ लाख ९५ हजारांची वाहने जप्त करण्यात आली आहेत.

त्यांच्या कडे केलेल्या अधिक चौकशीत या दोघांनी वसई येथील फरार सराईत गुन्हेगार आकाश जयवंत पाटील यांच्या सोबतीने वसई परिसरा मध्ये या रिक्षा चोरी केल्याची कबुली दिली आहे.फरार आरोपी आकाश पाटील याच्या विरोधात वसई तालुक्यात विविध पोलीस ठाण्यात सहा गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली आहे. 

टॅग्स :thaneठाणेbhiwandiभिवंडीArrestअटक