शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा-टॅक्सीची १ फेब्रुवारीपासून बेकायदा भाडेवाढ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 01:09 IST

प्रलंबित रिक्षा भाडेदरवाढ विनाविलंब मिळावी, अशा मागणीचे पत्र देऊनही त्याकडे परिवहन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने १ फेब्रुवारीपासून स्वयंघोषित बेकायदा भाडेवाढ करण्याचा निर्णय कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघाने घेतला आहे.

कल्याण : प्रलंबित रिक्षा भाडेदरवाढ विनाविलंब मिळावी, अशा मागणीचे पत्र देऊनही त्याकडे परिवहन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने १ फेब्रुवारीपासून स्वयंघोषित बेकायदा भाडेवाढ करण्याचा निर्णय कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघाने घेतला आहे. यासंदर्भातील पूर्वसूचना पत्र महासंघाने परिवहन आयुक्तांना पाठविले आहे. स्वयंघोषित भाडेवाढीमुळे प्रवाशांमध्ये संभ्रम तसेच असंतोष पसरून जर वादविवाद झाले तर त्याची जबाबदारी परिवहन प्रशासनाची राहील, असा इशारा महासंघाने दिला आहे.सध्या रिक्षा प्रवासासाठी पहिल्या दीड किलोमीटरसाठी १८ रुपये भाडे आकारले जात आहे. त्यात वाढ करून ते २२ रुपये करावे. तर, पुढील किलोमीटरसाठी १२ रुपयांवरून १६ रुपये दरवाढ मिळावी, अशी मागणी रिक्षा आणि टॅक्सीचालकांची आहे. महागाई निर्देशंकानुसार दरवर्षी योग्य ती भाडेदरवाढ दिली पाहिजे. पंरतु, सीएनजी गॅस दरात पाच रु पये प्रति किलो वाढ होऊनही चार वर्षे रिक्षा व टॅक्सी भाडेदरवाढ केलेली नाही, असे महासंघाचे म्हणणे आहे.प्रचंड वाढलेली महागाई व अनेक कारणांमुळे रिक्षा-टॅक्सी व्यावसायिक त्रस्त आहेत. रिक्षा व्यवसाय अक्षरश: डबघाईला आला आहे. वारंवार मागणी करूनही परिवहन प्रशासनाकडून भाडेदरवाढीबाबत चालढकल सुरू आहे. भाडेवाढ प्रलंबित ठेवणे अन्यायकारक असून, लवकरात लवकर याबाबत अंमलबजावणी करा, अन्यथा १ फेब्रुवारीपासून दरवाढ जाहीर केली जाईल, असे महासंघाने पत्रात म्हटले आहे.>मुख्यमंत्र्यांनाही पत्रमहासंघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र पाठवून रिक्षा आणि टॅक्सीचालकांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधले आहे.भाडेदरवाढ मिळावी, तसेच आॅटो रिक्षा-टॅक्सींच्या नवीन परवाने वाटपाला विनाविलंब स्थगिती द्यावी, आॅटोरिक्षा कल्याणकारी महामंडळाच्या स्थापनेची अंमलबजावणी करावी, आॅटोरिक्षा टॅक्सी योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास होणाऱ्या विलंबाबाबत उपाययोजना करावी आदी मागण्या केल्या आहेत.या सर्व बाबींवर चर्चा विनिमय करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळही मागितल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी दिली.