शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचे स्टेअरिंग मुलांच्या हातात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 03:31 IST

एकीकडे रिक्षाचालकांच्या मुजोरीला प्रवाशांना सामोरे जावे लागत असताना आता रिक्षाचे स्टेअरिंग अल्पवयीन मुलांच्या हाती गेल्याने प्रवास धोकादायक झाला आहे.

- प्रशांत मानेडोंबिवली : एकीकडे रिक्षाचालकांच्या मुजोरीला प्रवाशांना सामोरे जावे लागत असताना आता रिक्षाचे स्टेअरिंग अल्पवयीन मुलांच्या हाती गेल्याने प्रवास धोकादायक झाला आहे. बहुतांश ठिकाणी हे चित्र दिसत असलेतरी आरटीओ आणि वाहतूक पोलिसांचा याकडे होत असलेला कानाडोळा चर्चेचा विषय ठरला आहे. परवाना नसताना बेकायदा रिक्षा चालविणाऱ्या या मुलांच्या टवाळखोरीमुळे प्रवासी मेटाकुटीस आले आहेत.कल्याण-डोंबिवलीत रिक्षांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे नवीन परवाना वाटप थांबवा, अशी मागणी रिक्षा संघटनांनी केली आहे. परंतु, सरकारने परवाना देणे सुरूच ठेवल्याने वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण होऊन कोंडीत भर पडत आहे. रिक्षा परवाना घेऊनही दुसरा व्यवसाय करणारेही अनेक जण आहेत. त्यामुळे अल्पवयीन मुलांच्या हाती रिक्षा जात असल्याचे बोलले जात आहे.परवानाधारक रिक्षाचालकाकडे परवाना आणि बॅज बंधनकारक आहे. परंतु, काही रिक्षामालक ते नसलेल्या चालकांच्या हाती रिक्षा देत आहेत. त्यामुळे १५ ते १६ वर्षांची मुले सर्रासपणे रिक्षा चालविताना दिसत आहेत. अशांकडे गणवेश नसतो. ते बर्मुडा, हाफ पॅन्ट अशा पेहरावात रिक्षा चालवतात. स्टॅण्ड सोडून भाडे घेणे, गुटखा, मावा खाणे, मद्यपान, चरस आणि गांजाचे व्यसन, उद्धट, उर्मट वागणूक त्याचबरोबर मनमानीपणे भाडे ते आकारत असल्याचे चित्र कल्याण-डोंबिवलीत बहुतांश ठिकाणी पाहावयास मिळत आहे. त्यांच्या अशा वागणुकीमुळे सर्वसामान्य प्रामाणिक रिक्षाचालक भरडला जात आहे. तसेच रिक्षाव्यवसायही एकप्रकारे बदनाम होत आहे. अल्पवयीन मुलांच्या हातात रिक्षाचे स्टेअरिंग गेल्याने रिक्षाचा प्रवासही धोकादायक झाला आहे. २८ जूनला अशा टवाळखोर रिक्षाचालकाने त्याच्या साथीदारांच्या मदतीने प्रवाशाचे अपहरण करून त्याला लुटल्याची घटना घडली होती. त्यात प्रवाशीही जखमी झाला होता. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात नोंदही आहे. पण याउपरही अशा प्रवृत्तीला आळा घालण्याऐवजी त्याकडे आरटीओ आणि वाहतूक शाखेकडून पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे.>तक्रार करूनही कानाडोळाबेकायदा रिक्षा व्यवसाय करणाºयांविरोधात आरटीओ आणि वाहतूक शाखेकडे तक्रार केली आहे. अशा टवाळखोरांमुळे रिक्षा व्यवसायही बदनाम झाला आहे.रिक्षांची वाढती संख्या पाहता नवीन परवाना देणे थांबवा, अशीही मागणी केली आहे. पण, त्याकडेही दुर्लक्ष केल्याचे मत कोकण रिजन रिक्षा टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी व्यक्त केले.>कारवाई सुरू असल्याचा दावा : यासंदर्भात आमची कारवाई सुरू असते. मी स्वत: नुकताच दौरा करून, अशा रिक्षाचालकांवर केस दाखल केल्या आहेत. यामध्ये परवानाधारकाला एक महिन्याची निलंबन कारवाईपण आहे. याउपरही हे प्रकार सुरू असतील तर कारवाई तीव्र करावी लागेल, अशी प्रतिक्रिया आरटीओचे अधिकारी संजय ससाणे यांनी दिली.