शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

अमीर घरफोड्याला उत्तरप्रदेशातून अटक

By admin | Updated: March 6, 2016 01:38 IST

यशस्वी व्यावसायिक, पाच वर्षे गावचा सरपंच, प्रतिष्ठित व्यक्ती. मुंबई-अलाहाबाद नेहमी विमानाने प्रवास करणारा चक्क सराईत चोरटा निघाला असून त्याला माणिकपूर पोलिसांनी अलाहाबादहून

वसई : यशस्वी व्यावसायिक, पाच वर्षे गावचा सरपंच, प्रतिष्ठित व्यक्ती. मुंबई-अलाहाबाद नेहमी विमानाने प्रवास करणारा चक्क सराईत चोरटा निघाला असून त्याला माणिकपूर पोलिसांनी अलाहाबादहून अटक करून त्याचे खरे रुप उजेडात आणले. अस्लम इस्माईल शेख असे चोरट्याचे नाव असून ११ जानेवारी १६ रोजी माणिकपूर येथील साई नगरात झालेल्या चोरीत शेख सीसीटीव्हीत कैद झाला होता. त्यानंतर पीएसआय गणेश शिंदे यांनी त्याची माहिती काढली असता तो सराईत चोर असल्याचे उजेडात आले. अधिक माहिती घेऊन शिंदे यांनी शेख याच्या उत्तरप्रदेशातील प्रतापगड जिल्हयातील रामपूर रजवाडा गावात धाड टाकली. पण, पहिल्या धाडीत शेख हाती लागला नाही. त्यानंतर टाकलेल्या धाडीत मात्र शेखला जेरबंद करण्यात पोलिसांनी यश आले. शेख सराईत गुन्हेगार असून त्याने वसईसह मुंबई, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी परिसरात अनेक घरफोड्या केल्याची माहिती हाती लागली आहे. त्याहीपेक्षा शेखची गावात असलेली प्रतिष्ठा पोलिसांना चक्रावून गेली. शेखने गावी अनेक व्यवसाय सुुरु केले असून त्याच्या दिमतीला दोन-तीन गाड्या आहेत. २०१० ते २०१५ पर्यंत तो गावचा सरपंचदेखिल होता. इतकेच नाही तर शेख मुंबईत घरफोड्या केल्यानंतर गावी निघून जायचा. गावी ये-जा विमानाने करीत असल्याने गावात करोडपती आणि प्रतिष्ठित अशी त्याची प्रतिमा होती. (प्रतिनिधी)