शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

भाड्याच्या मालमत्तांच्या कराच्या दरात सवलत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 00:41 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी नागरिकांवर नवीन कर लागू करण्यासह विद्यमान करांच्या दरात वाढ करण्याचा प्रस्ताव सत्ताधारी भाजपाने आणला आहे

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी नागरिकांवर नवीन कर लागू करण्यासह विद्यमान करांच्या दरात वाढ करण्याचा प्रस्ताव सत्ताधारी भाजपाने आणला आहे. तसेच भाडेतत्त्वावरील अधिकाधिक मालमत्ताकराच्या जाळ्यात आणण्यासाठी त्यांच्या कराच्या दरात सवलत देण्याचा विचार सुरू आहे.शहरातील अनेक मालमत्ता भाडेतत्त्वावर दिल्या जातात. त्यात निवासी व व्यावसायिक मालमत्तांचा समावेश असला तरी पालिकेकडून भाडेतत्त्वावरील निवासी मालमत्तांना वगळले जाते. उर्वरित भाडेतत्त्वावरील व्यावसायिक मालमत्ता, कर विभागाच्या सर्वेक्षणातून निश्चित केल्या जातात. अशा मालमत्तांकडून पालिका त्यांच्या वार्षिक भाड्याच्या करयोग्य मूल्यावर सुमारे ५७ टक्के कर आकारते. हा कर भरमसाट असल्याने अनेकजण अशा मालमत्ता उघड करत नाहीत. तसेच अनेकदा अशा मालमत्ता भाडेतत्त्वावर असूनदेखील त्यांच्या सर्वेक्षणात त्या दाखवल्या जात नाहीत. त्यामुळे पालिकेला उत्पन्नावर पाणी सोडावे लागते. भाडेतत्त्वावरील मालमत्ताकराचा दर जास्त असल्याने त्यात कपात करण्याचा प्रस्ताव येत्या २० फेब्रुवारीच्या महासभेत अंतिम मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे. त्यात भाडेतत्त्वावरील मालमत्तांपोटी वर्षाला प्राप्त होणाºया एकूण भाड्यात १० टक्के कपात करून करयोग्य मूल्य ग्राह्य धरले जाते. उर्वरित ९० टक्के वार्षिक भाड्यावर पालिका सुमारे ५७ टक्के कर आकारते. हा दर जास्त असल्याने त्यातून अपेक्षित उत्पन्न पालिकेला मिळत नाही. त्यामुळे त्यात कपात करून अधिकाधिक मालमत्ता कराच्या जाळ्यात आणण्यासाठी त्या मालमत्तांना प्राप्त होणाºया वार्षिक भाड्यातील केवळ २० टक्के करयोग्य मूल्य भाडे गृहीत धरण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या करयोग्य मूल्यावर केवळ १० टक्के इतकी करआकारणी करण्याचे प्रस्तावित करण्यात आले असून तत्पूर्वी या प्रस्तावावर विचारविनिमय करून कराच्या दरात फेररचना करण्यात यावी, असा ठराव १४ फेब्रुवारीच्या स्थायी समिती बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. त्यावर येत्या २० फेब्रुवारीच्या महासभेत अंतिम शिक्कामोर्तब केले जाऊन त्याची अंमलबजावणी १ एप्रिलपासून केली जाणार आहे. याच महासभेत मालमत्ताकरात सुमारे ५० टक्के वाढीला, पाणीवाढीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात येणार आहे. नवीन घनकचरा शुल्क, मलप्रवाह व पाणीपुरवठा लाभकर लागू करण्यासही मान्यता दिली जाणार आहे.नागरिकांच्या माथी या करांचा बोजा टाकला जात असताना दुसºया बाजूला भाडेतत्त्वावरील मालमत्तांना करात सवलत देत काही लक्ष्मीपुत्रांना लाभ देण्याचा उपद्व्याप सत्ताधारी भाजपाकडून केला जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. यावर विरोधकांची भूमिका मवाळ झाली की काय, असा प्रश्नदेखील उपस्थित करण्यात येत आहे. करवाढ व लागू करण्यात येणारे नवीन कर सत्ताधाºयांनी मागे न घेतल्यास येत्या निवडणुकीत भाजपाला धडा शिकवू, असा इशाराच नागरिकांनी दिला आहे.