शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!
2
रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार
3
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
4
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
5
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
6
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
7
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
8
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
9
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
10
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
11
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
12
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
13
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
14
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
15
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
16
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
17
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
18
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
19
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती

बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र दाखवून सेवानिवृत्ती, 19 वर्षांपूर्वी मिळवली नोकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 8:38 AM

उल्हासनगर महापालिकेत जन्मतारखेत फेरफार करून १९ वर्षांपूर्वी जनसंपर्क अधिकाऱ्याची नोकरी मिळविल्याचा प्रकार उघड होऊन युवराज भदाणे याच्याविरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

उल्हासनगर :  सर जे. जे. स्थायी वैद्यकीय मंडळ व ज. जी. समूह रुग्णालयाचे बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र महापालिकेला सादर करून सेवानिवृत्ती घेतल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांविरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. इतर सुविधा व सेवानिवृत्ती वेतन बंद करण्याचे संकेत महापालिकेने दिले आहेत.

उल्हासनगर महापालिकेत जन्मतारखेत फेरफार करून १९ वर्षांपूर्वी जनसंपर्क अधिकाऱ्याची नोकरी मिळविल्याचा प्रकार उघड होऊन युवराज भदाणे याच्याविरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्याने भदाणे एका महिन्यापासून फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणापाठोपाठ दोन सफाई कर्मचाऱ्यांनी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र महापालिकेला सादर करून सेवानिवृत्ती घेतल्याचा प्रकार उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. रंजनी दिनेश वाल्मिकी या सफाई कामगार म्हणून २६ सप्टेंबर २०१२ रोजी कामाला लागल्या. त्यांनी २६ एप्रिल २०१८ रोजी वैद्यकीय सेवानिवृत्तीचा अर्ज महापालिकेला सादर केला. १२ नोव्हेंबर २०२० रोजी त्यांचा वैद्यकीय अहवाल महापालिकेला मिळाला. त्यानुसार २६ नोव्हेंबर २०२० रोजी त्यांना वैद्यकीय सेवानिवृत्ती देण्यात आली; तर दुसऱ्या घटनेत ५ ऑगस्ट २००८ मध्ये संगीता रमेश आगळे या सफाई कामगार म्हणून महापालिकेत कामाला लागल्या. २२ मे २०१८ रोजी आगळे यांनी वैद्यकीय सेवानिवृत्तीसाठी अर्ज केला. शारीरिकदृष्ट्या पात्र आहेत की नाही, यासाठी जे. जे. रुग्णालय येथे तपासणी करून घेण्यासाठी महापालिकेच्यावतीने सांगण्यात आले. ५ ऑगस्ट  २०२० रोजी तपासणी अहवाल महापालिकेला मिळाल्यानंतर १८ डिसेंबर २०२० रोजी वैद्यकीय सेवानिवृत्ती देण्यात आली. 

फेरतपासणीत उघड; फसवणुकीचा गुन्हाnमहापालिकेने वैद्यकीय प्रमाणपत्र जे. जे. स्थायी वैद्यकीय मंडळाकडे फेरतपासणीसाठी पाठविल्यानंतर दोन्ही प्रमाणपत्रे बनावट असल्याचे उघड झाले. nअखेर पालिकेचे सहायक आयुक्त अच्युत सासे यांच्या तक्रारीवरून संगीता आवळे व रंजनी वाल्मिकी यांनी महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. nअसे प्रकार पालिकेत घडले असून, याबाबतची अधिक चौकशी करण्याचे संकेत उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिले आहेत.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाulhasnagar-acउल्हासनगर