शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील किरकोळ विक्रेत्यांना मिळणार दहा हजारांचा पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2020 15:51 IST

गुरुवारी भिवंडी महानगरपालिका शहर फेरीवाला समितीची बैठक घेण्यात आली त्या वेळी हे आवाहन करण्यात आले.

भिवंडी - शहरातील पदपथावर व्यवसाय करणाऱ्या पथ विक्रेत्यांसाठी विशेष सूक्ष्म पतपुरवठा सुविधा योजनेची अंमलबजावणी करण्यात येत असून त्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर योजने अंतर्गत पदपथ विक्रेत्यांना 10 हजार रुपयांचा निधी मिळणार आहे. शहरातील पथ विक्रेते यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन भिवंडी महानगरपालिका उपायुक्त मुख्यालय दीपक सावंत यांनी केले आहे. गुरुवारी भिवंडी महानगरपालिका शहर फेरीवाला समितीची बैठक घेण्यात आली त्या वेळी हे आवाहन करण्यात आले.लॉकडाऊनच्या काळात ज्या फेरीवाल्यांचा रोजगार गेलेला आहे. अशा सर्व फेरीवाल्यांना या पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधीची रक्कम रुपये दहा हजार कर्ज अनुदान स्वरूपात देण्यात येणार असून नगर पथ विक्रेता समितीचे कार्य व रूपरेषा व त्यांना ओळखपत्र देणे या विषयांवर या बैठकीत चर्चा झाली. शहरातील सर्व फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करणे, समितीने फेरीवाला सर्वेक्षणात मदत करणे, सर्व किरकोळ फेरीवाला याचे सर्वेक्षण करणे तसेच प्रत्येक फेरीवाला कर्ज अनुदानाचा लाभ मिळणे आवश्यक आहे.या कर्ज अनुदान योजनेचा लाभ घेणेसाठी फेरीवाले यांनी ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत. दरम्यान या संदर्भात कोणत्याही स्वरूपाची अडचण असल्यास महापालिकेतील राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान या कक्षाशी संपर्क साधावा असे उपायुक्त मुख्यालय दीपक सावंत यांनी स्पष्ट करीत जास्तीत जास्त किरकोळ फेरीवाले,विक्रेते यानी पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महानगरपालिके तर्फे करण्यात आले आहे.