शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नव्या कळवा खाडीपुलामुळे वाहतूक कोंडीत पडणार भर चिंचोळ््या बोगद्याचा परिणाम : घोडबंदर रोडची होणारा पुनरावृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 17:21 IST

कळवा खाडीवरील नव्या पुलाचे काम वेगाने सुरु आहे. परंतु ज्या ठिकाणी हा पुल खाली उतरविण्यात आला आहे. तेथून हाकेच्या अंतरावर विटावा सबवे असून तो अतिशय चिंचोळा असल्याने या ठिकाणी पुन्हा कोंडी फुटण्याऐवजी वाढण्याची भिती व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देपुलाचा मार्ग वाढविण्याची मागणीवाहनांची वर्दळ अधिक संख्येने वाढणार

ठाणे : ठाणे कळवा खाडीवर उभारण्यात येणाऱ्या  तिसऱ्या पुलाचे काम आता मार्गी लागत असले तरी हा पूल जेथे उतरत आहे तेथून पुढे असलेल्या विटावा बोगद्याच्या चिंचोळ्या मार्गामुळे पुन्हा कोंडी होण्याची भीती व्यक्त होत आहे. घोडबंदर मार्गावरील पूल जेथे संपतात व नवा पूल सुरु होतो त्या जंक्शनपाशी वाहतूक कोंडी होत असल्याने त्याचा फटका वाहन चालकांना बसत आहे. त्यामुळे ठाणे-कळवा खाडीवरील पुलाचे काम पूर्ण होण्यापूर्वीच यावर तोडगा काढला जावा, अशी आशा व्यक्त होत आहे.                    मुंबईतील सी लिंकच्या धर्तीवर ठाणे महापालिकेने विटावा पुलाखालील वाहतूक कोंडी सुटावी यासाठी या कळवा खाडी पुलावर तिसरा नवीन पुलाच्या कामाचा प्रस्ताव जानेवारी २०१२ मध्ये मांडला होता. सध्या कळवा खाडीवर एक ब्रिटीशकालीन आणि आणखी एक पूल आहे. परंतु ब्रिटीशकालीन पूल कमकुवत झाल्याने त्या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे दुसऱ्या  पुलावरील वाहतुकीचा वेग मंदावला आहे. हा दुसरा पूल वाहतुकीसाठी कमी पडू लागल्याने पालिकेने तिसऱ्या  पुलाचा पर्याय मांडला. महापालिकेने २०११-१२ या आर्थिक वर्षात यासाठी १० कोटींची तरतूद केली होती. आता या पुलासाठी १८३ कोटींचा खर्च केला जाणार आहे.          जुन्या दोन पुलांच्या बाजूलाच मात्र त्यांच्यापेक्षा थोड्या उंचीवर हा पूल उभारण्यात येणार आहे. ठाण्याकडून विटाव्याकडे जाण्यासाठी हा वन-वे पूल असणार आहे तर विटाव्याकडून येणाऱ्या वाहनांसाठी जुन्या पुलाचा पर्याय उपलब्ध आहे. या तिसऱ्या पुलामुळे येथील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे. ठाण्याकडून खारेगांव (मनिषा नगर) आणि विटाव्याच्या पुढे म्हणजेच ठाणे - बेलापूर दिशेला असा दोनही मार्गाने हा पूल खाली उतरणार आहे. तसेच कळव्याकडून ठाण्याकडे येतांना हा पूल साकेत, जेल तलाव आणि कोर्टनाका मार्गे ठाणे स्टेशनकडे खाली उतरणार आहे. तसेच आता यात थोडा बदल करण्यात आला असून, आत्माराम चौकापर्यंत रस्ता या पुलाला जोडण्यात येणार आहे.केबल स्टेड टाईपचा हा पूल असणार असून तो दीड कि.मी. लांबीचा असणार आहे. यामुळे विटाव्या पुलाखालील आणि कळवा नाक्यावर होणारी वाहतूक कोंडी फुटणार असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.       आजच्या घडीला या मार्गावरुन विटावा नवी मुंबईकडे जाणाºया वाहनांची संख्या ही दिवसाला ५० ते ६० हजारांच्या आसपास आहे. ऐरोली मार्गे जावे लागल्यास त्या ठिकाणी दोन टोल भरावे लागत आहेत. त्यामुळे भविष्यात या फ्रीवेचाच वापर अधिक होणार आहे. नवा ब्रीज सुरु झाल्यानंतर वाहनांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. नवा ब्रीज हा कळवा हॉस्पिटलच्या ठिकाणी उतरवण्यात येणार असून तेथून पुढे विटाव्या पुलाचा चिंचोळा मार्ग आहे. या पुलावरुन येणारी वाहतुक येथे येऊन तिला ब्रेक लागणार आहे. त्यामुळे या नव्या पुलावरुन आतापासूनच तर्कविर्तक केले जाऊ लागले आहेत. घोडबंदर मार्गावर रस्ते चार पदरी असतांना या ठिकाणी जेथे पूल खाली उतरतात, त्याठिकाणी वाहतूक कोंडी होतांना दिसते. भविष्यात या नव्या पुलामुळे हीच परिस्थितीत विटावा बोगद्याजवळ उदभवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाkalwaकळवा