शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लग्न, वाढदिवस खर्चावर निर्बंध; आगरी महोत्सवात निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 00:26 IST

समाजासाठी आर्थिक हातभार लावण्याचा ठराव झाला मंजूर

- पंकज पाटीलबदलापूर : आगरी समाजातील लग्न, हळद आणि वाढदिवस हे खर्र्चिक बाब झाली आहे. आगरी समाज आर्थिकदृष्ट्या समृध्द होत असताना खर्चांवर निर्बंध राहत नाही. मोठ्या प्रमाणात खर्च करण्याची फॅशन समाजात रूढ झाली आहे. त्यामुळे बदलापूरमधील आगरी महोत्सवात बदलापूर शहर आणि ग्रामीण भागातील समाज बांधवांनी या खर्चावर निर्बंध घालण्याचा ठराव केला.सर्वात आधी समाजातील राजकीय नेत्यांनी हा वायफळ खर्च बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढदिवसांवर लाखोंचा खर्च न करता हा वाढदिवस साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. तर या वाढदिवसाच्या खर्चापैकी काही रक्कम समजाच्या उन्नतीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.ठाणे जिल्ह्यात अनेक महोत्सव भरविले जातात. नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधी अनेक महोत्सव भरवून प्रसिध्दी मिळविण्याचा प्रयत्न होत असतो. मात्र बदलापूरमध्ये नुकत्याच झालेला आगरी महोत्सव हा खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरला आहे. हा महोत्सव केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता या महोत्सवात आगरी समाजातील वाढत चाललेला वाढदिवसाच्या प्रथा बंद करण्याचा ठराव करण्यात आला. बदलापूर शहर आणि ग्रामीण भागातील आगरी बांधवांनी या पुढे आपले वाढदिवस दिमाखात साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच लग्न आणि हळदी समारंभावर होणारा अवास्तव खर्च कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच वाढदिवसाच्या निमित्ताने वाचणारा पैसा सामाजिक कामासाठी वापरण्यावर एकमत झाले आहे.गेल्या काही वर्षात आगरी समाजातील लग्न, हळदी समारंभ आणि बड्या व्यक्तींचे वाढदिवस आणि त्यावर होणारे खर्च हे चर्चेत आले होते. आर्थिक सुबत्ता आल्यावर समाज बांधवांचे खर्चावर निर्बंध राहिलेले नाही. त्यामुळे वाढदिवस हे जंगी होत चालले होते. वाढदिवस साजरा करण्याची फॅशन प्रचलित झाली होती. या आधी लग्न आणि हळदी समारंभही चर्चेचे विषय होते. त्यात वाढदिवसांचीही भर पडली.नेत्यांचे वाढदिवसच नव्हे तर नेत्यांच्या आणि बड्या व्यक्तींच्या मुलांचे वाढदिवसही खर्ची होत होते. त्यामुळे समाजात चुकीची पध्दत प्रचलित झाली होती. या सर्वांवर निर्बंध घालणे शक्य होत नसल्याने आता आगरी महोत्सवात या संदर्भात चर्चा करून निर्णय घेण्यात आला. आगरी समाजातील चुकीच्या चालीरिती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.हळदी समारंभातील राडा कमी करून हा खर्चही कमी करण्यावर एकमत झाले. हा निर्णय कुणावर लादण्यात आलेला नसला तरी या संदर्भातील निर्णय प्रत्येकाने स्वत: घ्यावे असे निश्चित करण्यात आले. समाजबांधव कसा प्रतिसाद देतात याकडे लक्ष लागले आहे. या समाजातील लग्नसोहळा म्हणजे थाटामाटात साजरा केला जातो. तसेच हळदीच्या कार्यक्रमावरही मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. पण प्रत्येकालाच हे परवडत नाही असेही काहींनी सांगितले.म्हात्रे वाढदिवस साजरा करणार नाहीतबदलापूरमधील काही नेत्यांच्या वाढदिवसाची चर्चा ही सर्वत्र असते. त्यात वामन म्हात्रे यांचा वाढदिवस हा सर्वाधिक चर्चेत राहणारा असतो. त्यामुळे म्हात्रे यांनी स्वत:चा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या वाढदिवसाचा वाचणारा खर्च हा आगरी समाजातील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च करण्यात येणार आहे. त्यासाठी समाजाने जो ट्रस्ट स्थापन केला आहे त्यात ती मदत दिली जाणार आहे.दारूवरील खर्च कमी करण्यावर एकमतआगरी समाजातील हळद समारंभात दारूचा अवास्तव वापर होतो. तो खर्चही कमी करण्यावर एकमत झाले आहे. हळदी समारंभात दारू टाळण्यावरही चर्चा झाली. या संदर्भातील निर्णय प्रत्येकानेच घेतला पाहिजे असा सूर उमटला. तसेच हा खर्च कमी करण्याबाबत प्रत्येकाने निर्णय घ्यावे असेही निश्चित करणयत आले.समाजात अनिष्ट चालीरिती वाढत आहेत. आर्थिक सुबत्ता वाढत असताना चुकीच्या प्रथा वाढत होत्या. त्यामुळे काही निर्णय घ्यावे लागले. या पुढे सामाजिक उपक्रमात सर्वाधिक वावर वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येईल.- शरद म्हात्रे, समाजबांधव

टॅग्स :marriageलग्न