ठाणे-पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक धरणे, नद्या आहेत. मासेमारी आणि शेती हे पारंपरिक व्यवसाय येथे केले जातात. सध्या कोरोना साथरोगमुळे रेस्टॉरंट बार, धाबे बंद आहेत. त्यामुळे मद्यपींनी आपला माेर्चा धरण क्षेत्र, नदी-ओहळाकडे वळवला आहे. तेथे हाेणाऱ्या पार्ट्यांनंतर दारूच्या बाटल्या, चाखणा व जेवणाचे साहित्य तेथेच पडून असतात. यामुळे निसर्गस्थळाचे नुकसान हाेत आहे. मत्स्य व्यावसायिक, शेतकरी, फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक जण नशेतच पाण्यात उतरतात. त्यामुळे पाण्यात बुडण्याच्या घटनाही घडत आहेत. सध्या कोरोना संक्रमण काळ असल्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा व्यग्र आहेत. त्यामुळे मद्यपींना धरणक्षेत्र, नदी-ओहळ परिसरात पार्ट्या झोडण्यास माेकळे रान मिळत आहे.
काेट
सध्या शासनाने जमावबंदी लागू केली आहे. शिवाय, निसर्गरम्य परिसरात कचरा करणे, बाटल्या फाेडणे यासारखी कृत्ये ही दंडनीय गुन्हाच ठरवायला हवा.
अशा लोकांवर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करायला हवी.
- सुजाण सुरेश वडके, जागृत नागरिक, वासिंद-शहापूर
धरणक्षेत्र, नदीकाठी अशा प्रकारे पार्ट्या करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी विशेष पथक तयार करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
- नवनाथ ढवळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, शहापूर