शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गरीब मुलीच्या विवाहाची स्वीकारली जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 03:37 IST

एका गरीब कुटुंबातील मुलीच्या विवाहाची जबाबदारी स्वीकारून मनसेचे शहर संघटक व परिवहन समिती सदस्य प्रल्हाद म्हात्रे यांनी आपल्या सामाजिक कार्याची प्रचिती दिली आहे.

डोंबिवली : एका गरीब कुटुंबातील मुलीच्या विवाहाची जबाबदारी स्वीकारून मनसेचे शहर संघटक व परिवहन समिती सदस्य प्रल्हाद म्हात्रे यांनी आपल्या सामाजिक कार्याची प्रचिती दिली आहे. पश्चिमेतील चिंचोड्याचा पाड्यातील बाबाजी म्हात्रे चाळीत राहणाऱ्या सविता ठाकरे यांची मुलगी मनीषा हिच्या लग्नाची आर्थिक जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.सविता यांचे पती शांताराम ठाकरे यांचे २०१० मध्ये कॅन्सरने निधन झाले. मात्र, सविता यांनी न खचता घरची धुणीभांडी करून मोठ्या हिंमतीने सहा मुलींचे पालनपोषण केले. परिस्थितीशी दोन हात करून त्यांनी पाच मुलींची लग्ने मोठ्या निर्धाराने केली. या कालावधीत वेळोवेळी म्हात्रे यांनी आर्थिक हातभार लावल्याचे त्या सांगतात.मनीषा हिचे लग्न ठरून टिळा लावण्याची तारीख ८ एप्रिल २०१८ ठरली होती. पण पैसा उभा कसा करायचा, असा प्रश्न त्यांना पडला होता. नातेवाइकांच्या सल्ल्यानुसार त्यांनी म्हात्रे यांच्याकडे व्यथा मांडली. म्हात्रे यांनी त्यांचे मित्र अ‍ॅड. प्रदीप बावस्कर यांनी ठाकरे यांच्या घरच्या वस्तुस्थितीचा आढावा घेत लग्नाच्या खर्चाची जबाबदारी स्वीकारली. मनीषाचा साखरपुडा ठरल्याप्रमाणे ८ एप्रिलला मुरबाडच्या खानिवारे येथील प्रमोद चौधरी यांच्याशी म्हात्रे आणि बावस्कर यांच्या उपस्थितीत आनंदात पार पडला.दरम्यान, म्हात्रे यांनी आजवर गरजूंना मदत करणे, दुर्घटनाग्रस्त इमारतीतील कुटुंबाला दत्तक घेणे, लहान बाळाच्या हृदय शस्त्रक्रियेचा खर्च उचलणे, खेळाडूचे पालकत्व स्वीकारणे, वाहक-चालकांना परिवहनचे मानधन देणे, भावना पटेल हिच्या लग्नाचा खर्च उचलणे, नाम फाउंडेशनला देणगी देणे, अशी अनेक विधायक कार्य केली आहेत. त्यात आता या मुलीच्या विवाहाच्या जबाबदारीच्या कार्याची भर पडली.